Black Pepper For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करणं काही सोपं काम नाही. जे जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात हे सगळ्यांना आता चांगलं माहीत पडलं असेल. तसेच पोटात जमा झालेली चिव्वट चरबी सुद्धा सहजपणे गळून पडत नाही. या समस्येचा सामना जास्तीत जास्त लोकांना करावा लागतो.
एक्सरसाईज, डायटिंग हे सगळं करूनही तुमची पोटावर वाढलेली चरबी कमी होत नसेल तर तुम्ही काही घरगुती उपायही ट्राय करू शकता. अनेकांना हे माहीत नसतं की, आपल्या किचनमध्येच अशा काही गोष्टी असतात ज्या वाढलेली चरबी कमी करू शकतात आणि तुमचं वजन कमी (Weight Loss) होऊ शकतं. असाच एक मसाला म्हणजे काळी मिरी. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरली जाणारी काळी मिरी चरबी कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. मात्र, यानं मदत कशी मिळेल जाणून घेणं महत्वाचं ठरतं.
काळ्या मिरीतील पोषक तत्व?
काळ्या मिरीला मसाल्यांनी राणी मानलं जातं. कारण यात अनेक पोषक तत्व असतात. यात व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन के, व्हिटामिन बी6, व्हिटामिन बी2, मॅग्नेशिअम, कॉपर, आयर्न, फॉस्फोरस, कॅल्शिअम, पोटॅशिअम, सोडिअम यांसारखे तत्व आहेत. ज्यांद्वारे शरीराला अनेक फायदे मिळतात.
काळी मिरीनं वजन होईल कमी?
काळी मिरी वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवते. तिखट काळ्या मिरीशिवाय अनेक पदार्थ तयारच होत नाहीत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याच काळ्या मिरीनं तुमची चरबी कमी होऊन वजनही घटू शकतं. यात आढळणाऱ्या थर्मोजेनिक गुणांमुळे आणि पिपेरिन नावाच्या तत्वानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे शरीरात वाढलेली चरबी कमी होते.
काळी मिरी कशी खाल?
1) काळ्या मिरीचा चहा
तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, वाढलेली चरबी कमी करायची असेल तर दूध आणि साखरेचा चहा बंद करायला हवा. त्याऐवजी काळी मिरी घातलेला चहा तुम्ही पिऊ शकता. काळी मिरी ग्रीन टी मध्ये टाकूनही तुम्ही पिऊ शकता.
2) काळ्या मिरीचं तेल
काळ्या मिरीचं तेल बाजारात सहजपणे मिळतं. हे तेल तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात कमी प्रमाणात टाकलं तर तुम्हाला चरबी कमी करण्यास मदत मिळू शकते.
3) सलादमध्ये काळी मिरी
भरपूर लोक हेल्दी डाएट म्हणून सलाद खातात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या सलादमध्ये काळी मिरी टाकून खाऊ शकता. यानं सलादची टेस्ट तर वाढेलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
काळ्या मिरीचे इतरही फायदे
काळ्या मिरीनं वजन कमी होण्यासोबतच इतरही अनेक फायदे मिळतात. यानं पचनक्रिया चांगली होते, इम्यूनिटी मजबूत होते, झोपेची क्वालिटी सुधारते, त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. पोटासंबंधी अनेक समस्या काळ्या मिरीनं दूर होतात. फक्त काळी मिरी कमी प्रमाणात खावी कारण ही गरम असते. जास्त खाल तर फायद्यांऐवजी नुकसान जास्त होऊ शकतं.