सतत वाढत जाणारे वजन ही सध्याची फारच कॉमन समस्या आहे. आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये वजन कमी करणे हे अनेकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. वेटलॉस करण्यासाठी आपण जिम, डाएट प्लॅन, महागडे सप्लिमेंट्स यांची मदत घेतो. इतकंच काय तर तासंतास जिममध्ये घालवतो किंवा कडक डाएट करतो. नैसर्गिक पद्धतीने वेटलॉस करायचं म्हटलं तर, योग्य आहार आणि एक्सरसाइजसोबतच, इतर घरगुती उपाय देखील तितकेच परिणामकारक ठरू शकतात. स्वयंपाकघरात सहज मिळणारे तमालपत्र फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. विशेषतः तमालपत्राचा चहा नियमितपणे घेतल्यास मेटाबॉलिझम सुधारतो, पचनक्रिया चांगली होते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते(bay leaf tea for fat loss).
अलिकडच्या काळात 'बे लीफ टी' म्हणजेच तमालपत्राचा चहा वेट लॉससाठी जगभरात लोकप्रिय होत आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यापर्यंत या चहाचे अनेक फायदे आहेत. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचे असेल, तर तमालपत्राचा चहा पिणे अधिक फायदेशीर ठरते. केवळ (best tea for weight loss) जेवणाची चव वाढवणारे तमालपत्र चहाच्या स्वरूपात घेतल्यास शरीरातील चरबी कमी करण्यास कशी मदत करते ते पाहूयात...
तमालपत्राचा चहा कसा करायचा ?
तमालपत्राचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला १ ग्लास पाणी, २ ते ३ तमालपत्र, १ छोटा दालचिनीचा तुकडा, १ छोटा आल्याचा तुकडा किंवा लिंबाचा रस, १ टेबलस्पून मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
चहा तयार करण्याची योग्य पद्धत...
एका पातेल्यात १ ग्लास पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा. त्या पाण्यात २ ते ३ तमालपत्रे टाका. अधिक फायद्यासाठी तुम्ही यात दालचिनी किंवा आल देखील घालू शकता. हे पाणी ५ ते १० मिनिटे चांगले उकळू द्या, जेणेकरून तमालपत्राचा अर्क पाण्यात उतरेल. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि पातेल्यावर २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून द्या. आता हा चहा गाळून एका कपमध्ये घ्या. चहा थोडा कोमट झाला की त्यात मध मिसळा.
PCOS/PCOD मुळे सुटलेली 'ढेरी' आता होईल पटकम कमी! फक्त आहारात करा ३ सोपे बदल...
पन्नाशी उलटली तरी इतकी कशी हॉट दिसते शिल्पा शेट्टी? फिटनेससाठी ६ गोष्टी न चुकता करते...
तमालपत्राचा चहा पिण्याचे फायदे...
१. हा चहा शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करून चरबी जाळण्यास मदत करतो.
२. तमालपत्रामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि गॅस किंवा अपचनाचा त्रास कमी होतो.
३. यातील पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
४. तमालपत्राचा चहा प्यायल्याने मन शांत राहते आणि मानसिक तणाव कमी होतो.
५. हा चहा रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करतो.
६. यातील व्हिटॅमिन 'सी' मुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
७. हा चहा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करतो.
८. शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज किंवा वेदना कमी करण्यासाठी हा चहा गुणकारी ठरतो.
Web Summary : Bay leaf tea aids weight loss by boosting metabolism and improving digestion. It helps burn fat, detoxify, and regulate blood sugar. Add cinnamon, ginger, or lemon for extra benefits.
Web Summary : तेज पत्ता चाय चयापचय बढ़ाकर और पाचन में सुधार करके वजन घटाने में मदद करती है। यह वसा जलाने, विषहरण करने और रक्त शर्करा को नियंत्रित करने में सहायक है। अतिरिक्त लाभ के लिए दालचीनी, अदरक या नींबू मिलाएं।