सध्याची बिझी लाईफस्टाईल आणि धावपळीच्या आयुष्यात पोटाचा घेर वाढणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. बाहेर आलेली पोटाची 'ढेरी' कोणालाच आवडत नाही. आरशासमोर उभं राहिल्यावर प्रत्येकालाच आपलं पोट अगदी सपाट, स्लिम-ट्रिम आणि फिट असावं असं वाटतं. अनेकजण तर 'सिक्स पॅक ॲब्स' मिळवण्याचं स्वप्नही पाहतात. मात्र, यासाठी फक्त डाएट करून किंवा उपाशी राहून चालत नाही. "मला पण स्लिम-ट्रिम दिसायचंय", "मला पण परफेक्ट फिगर हवीय" असं प्रत्येकीलाच वाटत असतं. आजकाल तर 'सिक्स पॅक ॲब्स'ची क्रेझ फक्त सेलिब्रिटींपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वसामान्यांनाही तसंच फिट राहावंसं वाटतं. पण मग अडतं कुठे?(best exercise for 6 pack abs).
अडतं ते म्हणजे 'नेमका कोणता व्यायाम करायचा' हेच (belly fat loss exercises at home) अनेकांना माहित नसतं...अनेकजण तासंतास कार्डिओ करतात किंवा जेवण कमी करतात, पण पोटावरची ' हट्टी चरबी' काही केल्या कमी होतच नाही. उलट चुकीच्या व्यायामामुळे कंबरदुखीचे त्रास मागे लागतात. मग घरच्या घरी, कमी वेळात आणि कोणत्याही महागड्या उपकरणांशिवाय पोटाची ढेरी कमी करून ॲब्स मिळवण्याचा सर्वात 'बेस्ट' मार्ग कोणता? मराठी सिनेसृष्टीतील प्रिया बापट सारख्या फिटनेस आयकॉनच्या टोन्ड बॉडीचं सिक्रेट दडलंय ते एका खास व्यायामात...तो व्यायाम कोणता, करण्याची योग्य पद्धत काय आणि अवघ्या काही महिन्यांत (how to get six pack abs fast) तुम्ही तुमचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करू शकता याची भन्नाट ट्रिक पाहूयात...
सिट - अप्स (Sit-ups) पोटाची चरबी कमी करण्यासाठी बेस्ट एक्सरसाइज...
पोटाचा घेर कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे व्यायाम करतात, पण प्रत्येकालाच हवा तसा रिझल्ट मिळत नाही. पोटाची वाढलेली ढेरी किंवा भलंमोठं पोट आणि पोटावरील हट्टी चरबी वेगाने कमी करण्यासाठी 'सिट-अप्स' अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला जिममधील कोणत्याही महागड्या उपकरणांची (Equipment) गरज भासत नाही. तुम्ही घरच्या घरी हा व्यायाम सहज करू शकता.
तिशी ओलांडताच भारतीय स्त्री-पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट- लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...
सिट - अप्स करण्याची योग्य पद्धत...
१. सर्वात आधी एका सपाट जमिनीवर मॅट अंथरून पाठ जमिनीला टेकवून झोपा. आता तुमचे दोन्ही गुडघे दुमडा. तुमचे दोन्ही पाय जमिनीवर स्थिर राहतील याची काळजी घ्या. पाय हलू नयेत म्हणून तुम्ही ते पलंगाच्या खाली अडकवू शकता किंवा सुरुवातीला कोणाला तरी पाय पकडायला सांगू शकता.
२. यानंतर तुमचे दोन्ही हात वर उचलून डोक्याच्या मागे ठेवा. आता हळूवारपणे डोके आणि शरीराचा वरचा भाग उचलून मांड्यांच्या दिशेने (काटकोनात) वर घेऊन या.
३. या स्थितीत साधारण एक सेकंद थांबून पोटाच्या स्नायूंवर ताण जाणवू द्या. त्यानंतर हळूहळू पुन्हा पहिल्यासारखे जमिनीवर झोपा (पूर्वस्थितीत या).
४. ही संपूर्ण प्रक्रिया साधारण २० वेळा पुन्हा करा. सुरुवातीला कमी वेळा केली तरी चालेल, पण हळूहळू सराव वाढवा.
आई झाल्यावर आलिया भटने ३ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, तिनं केल्या फक्त ६ गोष्टी-वाचा कोणत्या...
फक्त २१ दिवस मुलांवर ओरडू नका ! दिसतील ३ बदल, करून तर पाहा 'हा' छोटासा प्रयोग...
सिट-अप्स करण्याचे फायदे (Benefits Of Sit-Ups)...
१. पोटाचे स्नायू होतात मजबूत :- नियमितपणे सिट-अप्स केल्यामुळे पोटाचे स्नायू (Abdominal Muscles) कमालीचे मजबूत होतात. हा व्यायाम पोटाच्या स्नायूंना दीर्घकाळ ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि वजन उचलण्यासारख्या कष्टाच्या कामांसाठी तयार करतो. इतकंच नाही, तर जर तुम्हाला 'सिक्स पॅक ॲब्स' बनवायचे असतील, तर हा व्यायाम तुमच्यासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर ठरू शकतो.
२. शरीर बनते लवचिक :- सिट-अप्सच्या नियमित सरावामुळे पाठीचा कणा, कंबर आणि पायांच्या हाडांमधील लवचिकता वाढते. यामुळे शरीरातील कडकपणा किंवा आखडण्याची समस्या कमी होऊन हालचाली अधिक सुलभ होतात.
३. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :- जर तुम्ही पोटावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे हैराण असाल, तर सिट-अप्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. याचा नियमित सराव केल्यास कंबर आणि पोटावर साचलेली चरबी हळूहळू वितळण्यास मदत होते आणि शरीर सुडौल दिसते.
४. पाठीचा कणा होतो मजबूत :- सिट-अप्स करताना पाठीच्या कण्यावर योग्य ताण पडतो. जर तुम्ही योग्य पद्धतीने रोज सिट-अप्स केले, तर पाठीचा कणा मजबूत होण्यासोबतच 'डिस्क हायड्रेशन' सुधारण्यासही मोठी मदत मिळते.
