आजकाल लोक लाइफस्टाईलसंबंधी वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. हृदयरोग, लठ्ठपणा, कॅन्सर, डायबिटीस हे आजार तर सगळ्यात जास्त आढळतात. या आजारांसाठी लठ्ठपणा हे मुख्य कारण मानलं जातं. अशात लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण लठ्ठपणा कमी न होण्याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, जास्त फॅट असलेले पदार्थ, बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्ल्यानं एक्सरसाईज न केल्यानं लठ्ठपणा वाढतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, अजीर्ण झाल्यामुळेही शरीर फुगू लागतं. अजीर्णामुळे चेहरा, हात-पाय आणि पोट फुगू लागतं. आयुर्वेदिक डॉक्टर तन्मय गोस्वामी अजीर्णाला जगातील सगळ्यात मोठा आजार मानतात.
अजीर्णात काय होतं?
अजीर्ण म्हणजे अन्न न पचण्याची स्थिती असते. डॉक्टरांनुसार, जर अन्न पचन व्यवस्थित झालं नाही तर ते विष बनतं. जे शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकतं. जेव्हा अन्न अवशोषित होईल तेव्हा मेटाबॉलिक वेस्ट तयार होईल. ज्यामुळे इम्यून सिस्टीम बिघडले, व्यक्ती लठ्ठ होईल किंवा खूप जास्त बारीक होईल.
विष तयार होतं
डॉक्टर सांगतात की, अनेकदा असं होतं की, जेवण केल्यावर लगेच काही वेळानं व्यक्ती पुन्हा जेवण करते. आधीचं खाल्लेलं योग्यपणे पचलेलं सुद्धा नसतं. आधी जे खाल्लं त्याचा रस तयार झाला नसेल आणि वरून अजूनही काही खाल्लं तर ते विष बनतं.
अन्न पचन झाल्याची लक्षणं
ढेकर दिल्यावर अन्नाचा गंध न येणे
स्वत:हून भूक लागणे
शरीर हलकं वाटणे
काय कराल उपाय?
जर तुम्हाला ही लक्षणं दिसत नसतील तर थोडं थांबा आणखी काही खाऊ नका. त्यानंतर थोडं कोमट पाणी प्या आणि नंतर पुन्हा भूक लागेल तेव्हा काही खा.