बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा म्हणजेच विरुष्का हे दाम्पत्य त्यांच्या आहाराबाबत आणि फिटनेसबाबत अतिशय शिस्तबद्ध म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जेवणातले पदार्थ आणि जेवणाच्या वेळाही सहसा टाळल्या जात नाहीत. ही सवय त्यांनी त्यांच्या मुलांनाही लावलेली आहे. फिटनेस टिकवायचा आणि वजन, शुगर कंट्रोलमध्ये ठेवून तब्येत सांभाळायची असेल तर काही पदार्थ खाणं कटाक्षाने टाळायला हवं असं अनुष्काचं स्पष्ट मत आहे. त्यामुळेच तर मागच्या काही वर्षांपासून तिने कित्येक पदार्थ खाणं पुर्णपणे सोडून दिलं आहे (diet tips by Anushka Sharma). ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..(Anushka Sharma avoids 3 food for fitness and weight control)
अनुष्का शर्मा कोणते पदार्थ खात नाही?
अनुष्का शर्माच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग the_food_balance या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अनुष्का सांगते की ती गहू अजिबात खात नाही. कारण ग्लुटेन फ्री डाएटवर तिचा भर आहे. गहू आणि गव्हाचे पदार्थ तर ती टाळतेच पण मैदाही पुर्णपणे टाळते.
करपट ढेकर-ॲसिडीटी- गॅसेस होतात? अपचनासह पित्ताचा त्रास कायमचा कमी करणाऱ्या ५ गोष्टी
ग्लूटेन फ्री डाएट घेतल्यास शरीरावरची वाढलेली चरबी कमी होण्यास खूप जास्त मदत होते. त्याला पर्याय म्हणून मग ती गव्हाच्या पोळीऐवजी बाजरी, ज्वारी, राजगिरा, क्विनोआ यांच्या पिठाच्या भाकरी खाते. या भाकरी कणकेच्या पोळ्यांपेक्षा जास्त पौष्टिक आणि जास्त फायबर देणाऱ्या असतात, असं ती मानते.
याशिवाय ती साखर अजिबात खात नाही. आपल्याला माहितीच आहे की साखर ही आरोग्यासाठी किती त्रासदायक ठरते. साखर खाणं टाळलं तर आपोआपच वजन, शुगर नियंत्रित राहते.
वेटलॉस करणाऱ्यांसाठी कियारा आडवाणीच्या डाएटिशियनचा महत्त्वाचा सल्ला, ३ चुका टाळा- झटपट वजन उतरेल..
शरीरावर आलेली सूज कमी होते आणि त्याशिवाय त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. म्हणूनच कदाचित अनुष्काचा फिटनेस तर छान आहेच पण तिची त्वचाही सुंदर आहे.
गहू आणि साखर याप्रमाणेच अनुष्का तिसरा एक पदार्थ खाणं पुर्णपणे टाळते आणि तो पदार्थ म्हणजे दूध.दूध तर ती टाळतेच. पण दुधापासून तयार झालेला कोणताही पदार्थ ती खात नाही. अनुष्का वेगन डाएट करते. त्यामुळे पनीर, चीज, बटर असं काहीही तिच्या आहारात नसतं.
Web Summary : Anushka Sharma maintains her fitness by avoiding wheat, sugar, and dairy. She prefers gluten-free options like millet and quinoa. Cutting sugar helps control weight and improves skin. She follows a vegan diet, excluding all dairy products for overall well-being.
Web Summary : अनुष्का शर्मा गेहूं, चीनी और डेयरी से परहेज करके अपनी फिटनेस बनाए रखती हैं। वह बाजरा और क्विनोआ जैसे ग्लूटेन-मुक्त विकल्प पसंद करती हैं। चीनी कम करने से वजन नियंत्रित रहता है और त्वचा में सुधार होता है। वह संपूर्ण स्वास्थ्य के लिए सभी डेयरी उत्पादों को छोड़कर, वीगन डाइट का पालन करती हैं।