Join us

आलिया भटचा आवडता पदार्थ दही भात; ५ जबरदस्त फायदे-पाहा सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:39 IST

Alia Bhats favorite Benefits Of eating Curd Rice : दही भात पचायलाही हलका आहार आहे. भारतीय परंपरेतील दही भात हा एक सर्वोत्तम प्रोबायोटिक पदार्थांपैकी एक मानला जातो.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) ही आपल्या अभिनयामुळे आणि हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे ओळखली जाते. तिचा फिटनेस सगळ्यांनाच आकर्षीत करतो. एका मुलाखतीदरम्यान आलिया भटला तिची आवडती डिश कोणती असं विचारल्यानंतर तिनं दही भात असं उत्तर दिलं होतं. दही भात खाल्ल्यानं मनाला केवळ शांती मिळत नाही तर आरोग्यही चांगले राहते. ( Curd Rice Recipe How To Make Curd Rice)

त्वचाही सुंदर राहते. दही भात पचायलाही हलका आहार आहे. भारतीय परंपरेतील दही भात हा एक सर्वोत्तम प्रोबायोटिक पदार्थांपैकी एक मानला जातो. दही भात रोजच्या जेवणात का खावा, दही भात खाण्याचे फायदे काय आहेत समजून घेऊ. (Alia Bhats favorite Benefits Of eating Curd Rice Recipe)

दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे हेल्दी बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते. अपचन, बद्धकोष्टता असे त्रास उद्भवत नाहीत. पोट बिघडल्यानंतर डॉक्टरसुद्धा दही भात खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात दही भात खाल्ल्यानं शरीरातील अंतर्गत तापमान थंड राहते. यामुळे पोटात होणारी जळजळ शांत होते. मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे शरीर उत्साही राहते.

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. ज्यामुळे शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत मिळते. आलिया म्हणते त्याप्रमाणे पचनक्रिया चांगली असेल तर त्याचा थेट परीणाम आपल्या त्वचेवर दिसतो. दही भात पोट शांत ठेवतो. ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात आणि त्वचा मऊ, चमकदार राहण्यास मदत होते. दही भात खाल्ल्यानं शरीराला उर्जा मिळते. लवकर भूकही लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. वेट लॉस साठी हा एक उत्तम आणि पौष्टीक पर्याय आहे.

एका मोठ्या भांड्यात शिजवलेला आणि पूर्ण थंड झालेला भात घ्या. भात व्यवस्थित मॅश करून किंवा चमच्याच्या साहाय्यानं हलका दाबून घ्या त्यात दही आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रण खूपच घट्ट वाटल्यास त्यात २ ते ३ चमचे थंड दूध किंवा थोडं पाणी घालून एकसमान करा. एका लहान कढईत तूप किंवा तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहोरी घाला.

मोहोरी तडतडल्यावर त्यात उडीद डाळ आणि चणा डाळ घालून सोनेरी होईपर्यंत गरम करून घ्या. त्यात कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची आणि चिमूटभर हिंग घाला काही सेकंद परतून गॅस बंद करा. तयार तडका लगेच दही भाताच्या मिश्रणावर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. दही भात कोथिंबीर आणि डाळींबाच्या दाण्यांनी सजवा. हा भात थंड करून खाल्ल्यास त्याची चव अधिक लागते.

English
हिंदी सारांश
Web Title : Alia Bhatt's favorite curd rice: Benefits and easy recipe.

Web Summary : Alia Bhatt favors curd rice for its taste and health benefits. It aids digestion, cools the body, boosts immunity, and improves skin health. The simple recipe involves mixing rice with curd, tempering spices, and garnishing.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य