Join us

कोमट पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे फक्त २ थेंब, बेली फॅट होईल कमी, डॉक्टर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 15:04 IST

Add These 2 Drops To Warm Water Every Morning Melt Belly Fat Like Ice : Powerful Belly Fat Burning Home Remedies : बेली फॅट्स कमी करण्यासाठी हा साधासोपा घरगुती उपाय नेमका कसा करायचा, ते पाहा...

सध्याच्या काळात वाढते वजन एक फार मोठी समस्याच बनली आहे. आजकाल प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण आहे. वाढत्या वजनासोबतच पोटाचा घेर (Powerful Belly Fat Burning Home Remedies) देखील वाढतो. कामाच्या चुकीच्या वेळा, अनियमित आहार, तणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे पोटाभोवती चरबी साठू लागते. पोटाभोवती साचलेल्या चरबीमुळे शरीर बेढब तर दिसते, सोबतच यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या देखील यामुळे निर्माण होऊ शकतात. 

एकदा का आपल्या पोटाभोवती ही चरबी साठायला सुरुवात झाली, की ती कमी करणे सोपं नसतं, पण अशक्यही नाही. वाढलेल वजन आणि बेली फॅट्स कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज आणि योग्य डाएट फॉलो करणे आवश्यक(Add These 2 Drops To Warm Water Every Morning Melt Belly Fat) आहे. यासोबतच, बेली फॅट्स झटपट कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करु शकतो. डॉक्टर, मानसी मौर्य यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार, दररोज सकाळी कोमट पाण्यात काही विशेष नैसर्गिक तेलाचे दोन थेंब मिसळून प्यायल्याने बेली फॅट्स कमी होण्यास मदत होते. हा उपाय केल्याने फक्त बेली फॅट्स कमी होतात असे नाही तर, चयापचय क्रिया सुधारते आणि शरीराला आतून डिटॉक्स केले जाते. बेली फॅट्स कमी करण्यासाठी हा साधासोपा घरगुती उपाय नेमका कसा करायचा, ते पाहूयात... 

तेलाचे फक्त २ थेंब मिसळा कोमट पाण्यांत... 

बेली फॅट्स कमी करण्यासाठी डॉक्टर, मानसी मौर्य यांनी काही खास तेलांची नाव सुचवली आहेत. या तेलाचे फक्त २ थेंब दररोज कोमट पाण्यांत मिसळून घेतल्यास बेली फॅट्स कमी करण्यास मदत होते. खरंतर, काही प्रकारच्या नैसर्गिक तेलांमध्ये असे काही घटक असतात की जे शरीरातील चयापचय क्रियेचा वेग  गतिमान करतात. जेव्हा चयापचय क्रिया जलद गतीने होते तेव्हा शरीर जास्त कॅलरीज बर्न करते आणि चरबी झरझर वितळू लागते. या तेलांमध्ये बहुतेकदा लिंबू, आले, पुदिना किंवा ओव्यासारखे घटक असतात जे पोटातील गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठते सारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम देतात. याशिवाय, ते भूक नियंत्रित करतात आणि वारंवार काहीतरी खाण्याची सवय कमी करतात.

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

कोमट पाण्यातूनच का प्यावे ? 

पोटाची चरबी कमी करण्यात कोमट पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि पचन सुधारते. जेव्हा तुम्ही हे दोन थेंब त्यात मिसळता तेव्हा त्याचा परिणाम आणखी जलद होतो. कोमट पाणी शरीराचे तापमान वाढवते, ज्यामुळे चरबी विघटन होण्याची प्रक्रिया वेगवान होते. याशिवाय, ते शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे शरीरात अनावश्यक पाणी साचत नाही. विशेषतः सकाळी हा उपाय करणे सर्वात फायदेशीर मानले जाते.

नक्की कोणकोणत्या तेलाचे २ थेंब कोमट पाण्यांत घालावेत ?

सामान्यतः लिंबाचे तेल, पुदिन्याचे तेल किंवा आल्याचा अर्क असणारे तेल वापरणे फायदेशीर ठरते. ही सर्व तेलं अँटीऑक्सिडंट आणि डिटॉक्सिफिकेशन गुणधर्मांनी समृद्ध आहेत. त्यामध्ये असलेले घटक शरीरातील चरबी वितळवण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. तुम्हाला हे तेल थेट पिण्याची गरज नाही, कोमट पाण्यांत फक्त तेलाचे २ थेंब घालून ते पाणी प्यावे. याची चव सौम्य लागते आणि परिणाम हळूहळू दिसून येतात. 

खा चमचाभर 'ही' घरगुती आयुर्वेदिक पावडर ! पोटाची ढेरी - मांड्यांचा घेर होईल कमी - सोपा पण असरदार उपाय...

कधी आणि कसे प्यावे ? 

या उपायाचा खरा परिणाम तेव्हाच दिसून येईल जेव्हा तुम्ही तो नियमितपणे आणि योग्य वेळी कराल. हा उपाय करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी, काहीही न खाता, कोमट पाण्यात २ थेंब पिणे. त्यानंतर किमान ३० मिनिटे काहीही खाऊ नका. शरीर पूर्णपणे डिटॉक्स करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. आठवड्यातून ५ दिवस हा उपाय करणे फायदेशीर ठरेल. परंतु शरीरात होणाऱ्या बदलांकडे देखील काळजीपूर्वक लक्ष द्या. 

ही पद्धत नैसर्गिक असली तरी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः जर तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपाय करु नका. तसेच, हा उपाय जादूचा उपाय नाही - योग्य आहार, हलका व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे त्याचे परिणाम अनेक पटीने वाढू शकतात. जास्त तेल वापरणे टाळा आणि ते दिवसातून अनेक वेळा घेऊ नका. केवळ संयम आणि सातत्य असेल तरच तुम्हाला त्याचे खरे फायदे मिळतील.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स