वातावरणातील उष्णता वाढायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडगार पेयांची आठवण आता यायला लागते. पन्हं, लिंबू सरबत, ताक अशा पदार्थांमुळे उन्हाळा सुसह्य होऊन जातो. या घरगुती पेयांपैकी ताकाचे महत्त्व आता आपण पाहूया. उन्हाळ्यात तर नियमितपणे ताक प्यायलाच हवं, पण एरवीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात ताक घेत जावं, असा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ देतात. दह्यापेक्षाही ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय तुम्ही तिन्ही ऋतुंमध्ये ताक घेतलं तरी ते बाधत नाही. शिवाय ताक हे कफ, वात, पित्त अशा सगळ्याच प्रकृतीच्या लोकांना चालतं (8 Amazing Benefits Of Having Buttermilk Or Chaas Daily). ताक नियमितपणे प्यायल्यामुळे शरीराला काय फायदे होतात ते आता पाहूया..(importance of drinking buttermilk)
नियमितपणे ताक पिण्याचे फायदे
नियमितपणे ताक पिणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आयुर्वेदतज्ज्ञांनी healyourselfwith_manasikrishna या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ताक पिण्याचे सांगितलेले फायदे पुढीलप्रमाणे..
पोळ्या लाटण्याची-भाजण्याची कटकटच नाही, कणकेचा गोळा ठेवताच भराभर पोळ्या करणारं पाहा ‘हे’ मशिन
१. ताक प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२. ताकामधून चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ तसेच कॅल्शियम मिळते.
३. शाकाहारी लोकांसाठी ताक हा प्रोटीन्सचा खूप चांगला स्त्रोत मानला जातो.
४. हिरड्या बळकट होण्यासाठी तसेच हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तो त्रास कमी करण्यासाठीही ताक पिणे फायदेशीर ठरते. वारंवार तोंड येत असेल तर काही दिवस ताकाच्या गुळण्या करून पाहा. बरं वाटेल.
५. डोक्यातला वाढता कोंडा कमी करण्यासाठीही ताक उपयुक्त ठरते. तुमच्या रोजच्या जेवणात तर ताक घ्याच, पण आठवड्यातून एकदा डोक्यालाही लावा. कोंडा कमी होईल.
दूध- पोळी आवडीने खाता, मुलांनाही खाऊ घालता? गंभीर आजारांचा धोका! डॉक्टर सांगतात...
६. त्वचा अधिक चांगली, नितळ आणि तरुण राहण्यासाठीही ताक पिणे उपयुक्त ठरते.
७. खूप गळून गेला असाल, थकवा येऊन अशक्तपणा जाणवत असेल तर ग्लासभर ताक प्या. लगेच एनर्जी येईल.
८. मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनाही ताक पिणं फायदेशीर ठरतं.