Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...

सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...

7 Day Natural Weight Loss Plan By Celebrity Fitness Guru Miki Mehta : Natural Weight Loss Plan : How to naturally lose weight fast : वेटलॉससाठी सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता यांनी शेअर केले सेलिब्रिटीजचे वेटलॉस सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 14:47 IST2025-05-29T14:29:36+5:302025-05-29T14:47:01+5:30

7 Day Natural Weight Loss Plan By Celebrity Fitness Guru Miki Mehta : Natural Weight Loss Plan : How to naturally lose weight fast : वेटलॉससाठी सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता यांनी शेअर केले सेलिब्रिटीजचे वेटलॉस सिक्रेट...

7 Day Natural Weight Loss Plan By Celebrity Fitness Guru Miki Mehta Natural Weight Loss Plan How to naturally lose weight fast | सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...

सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...

वाढलेलं पोट, वजन कमी करण्यासाठी आजकाल आपल्यापैकी बरेचजण वेगवेगळ्या प्रकारचे वेटलॉस ट्रेंड फॉलो करतात. वाढलेलं वजन नेमकं कस कमी करायचं हा (7 Day Natural Weight Loss Plan By Celebrity Fitness Guru Miki Mehta) काहीजणांच्या बाबतीत खूप मोठा प्रश्न असतो. वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळे उपाय, डाएट आणि एक्सरसाइज फॉलो करतात. असे असले तरी काहीजणांच्या बाबतीत (Natural Weight Loss Plan) अनेक प्रयत्न करून देखील वजन 'जैसे थे, तसेच राहते. यासाठीच, सेलिब्रिटी फिटनेस कोच मिकी मेहता यांनी '7-Days Natural Weight Loss Plan' म्हणजेच ७ दिवसांत वजन कमी करण्यासाठी ६ खास नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे(How to naturally lose weight fast).

सेलिब्रिटी फिटनेस कोच मिकी मेहता यांच्या मतानुसार, सहा नियम, सात दिवस सातत्याने पाळल्यास आपल्याला नक्कीच वजनात फरक दिसू शकेल. या प्लॅननुसार, वजन कमी करण्यासाठी आपल्याला फक्त वेटलॉसचे ६ नियम आवर्जून पाळावे लागणार आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वेटलॉसचे हे ६ नियम शरीराचं संपूर्ण शुद्धीकरण करुन वजन घटण्यास मदत करतात. सेलिब्रिटी फिटनेस कोच मिकी मेहता यांनी वेटलॉससाठी सांगितलेले हे ६ नियम कोणते आहेत ते पाहूयात.  

वजन कमी करण्यासाठी पाळा ७-७-७ नियम... 

१. ७ लिटर कोमट पाणी प्या :- सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी दररोज ७ लिटर हलकं गरम पाणी पिणं उपयुक्त ठरू शकतं. यामुळे फक्त चरबी वितळवण्यास मदत होत नाही, तर शरीरातील मेटाबॉलिझमला गती देते आणि भुकेवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत मिळते. मात्र, ही सवय अचानकपणे स्वतःला लावून घेण्याऐवजी पाणी पिण्याचे प्रमाण हळूहळू वाढवत नेणं आवश्यक आहे. शरीराचे संकेत दुर्लक्षित न करता, दर तासाला १ ते १.५ ग्लास पाणी प्यायल्यास शरीरावर ताण येत नाही आणि हायड्रेशन योग्य पद्धतीने होते. तरीही, एवढ्या प्रमाणात पाणी प्यायचं असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून तुमच्या शरीरासाठी ही सवय योग्य आहे की नाही, हे समजू शकेल. 

वेटलॉससाठी मध आणि दालचिनी करतात जादू, वजन होईल झरझर कमी - करुन पाहा हा खास उपाय...

२. ७ वेगवेगळ्या प्रकारची फळं खा :- दररोज ७ वेगवेगळ्या प्रकारची फळं खाल्ल्याने शरीराला आवश्यक फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजे मिळतात. फिटनेस गुरु मिकी मेहता याला 'रंगबेरंगी आरोग्याचं रहस्य' असं म्हणतात. पपई, सफरचंद, केळं, डाळिंब, कीवी, संत्रं आणि स्ट्रॉबेरी यांसारखी फळं फक्त पचनशक्ती सुधारत नाहीत, तर शरीराला ऊर्जा देखील देतात. दिवसाची सुरुवात फळं खाऊन करा, या सवयीमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहील आणि उगाचच नको ते जास्तीचे खाण्याची इच्छा होणार नाही. फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, जो वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. 

३. ७ किलोमीटर चालणे :- चालणं हा सर्वांत सोपा, सुरक्षित आणि परिणामकारक एक्सरसाइज आहे. दररोज ७ किलोमीटर चालणं शरीराच्या प्रत्येक भागाला सक्रिय करतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत करतं. जर एकाचवेळी ७ किलोमीटर चालणे शक्य नसेल तर आपण त्याची दोन भागात विभागणी करून सकाळी ३.५ कि. मी आणि संध्याकाळी ३.५ कि. मी अशा पद्धतीने देखील चालू शकता. सलग ७ दिवस ७ किलोमीटर चालण्याची ही सवय वजन घटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. 

वजन कमी करण्यासाठी 'असं' प्या पाणी, वजन होईल झरझर कमी - तब्येत राहील ठणठणीत...

४. ७० मिनिटे मसाज करा :- बॉडी मसाज केल्याने स्नायूंना आराम तर मिळतोच शिवाय, शरीर डिटॉक्स होण्यास देखील मदत मिळते. दररोज ७० मिनिटांसाठी  मसाज केल्याने शरीरातील सुज कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं, आणि तणाव कमी होतो, जो अनेक वेळा वजन वाढण्याचं मुख्य कारण ठरतो. आपण आपल्या पसंतीनुसार ऑइल मसाज, अरोमा मसाज, किंवा डीप टिश्यू मसाज यापैकी कुठलाही प्रकार निवडू शकतो. 

अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...

५. ७ तासांची पुरेशी झोप :- झोप आणि वजन यांचं नातं अतिशय जवळचं आहे. झोपेची कमतरता झाली की हार्मोन्सचा समतोल बिघडतो, ज्यामुळे भूक वाढते आणि मेटाबॉलिझमचा वेग मंदावतो. मिकी मेहता यांच्यामते, वजन कमी करण्यासाठी ७ तासांची पुरेशी झोप घेणे अतिशय महत्वाचे असते. दररोज ७ तासांची झोप घेतल्याने शरीर आतून स्वतःची दुरुस्ती करते, स्नायूंना बळकटी मिळते, आणि मन सकारात्मक व शांत राहते.

६. स्वतःवर प्रेम करायला शिका :- मिकी मेहता यांचा हा वेटलॉसचा ७ दिवसांचा प्लॅन फक्त शरीरात बदल घडवून आणणारा नाही, तर तो तुमच्या विचारात देखील बदल घडवून आणू शकतो. जेव्हा आपण दररोज स्वतःसाठी ७ पावलं उचलतो, तेव्हा आपलं स्वतःशी एक भावनिक नातं तयार होतं. हा डाएट प्लॅन फक्त वजन कमी करण्यापुरती मर्यादित नसून, स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठीची एक चांगली सवय आहे.


Web Title: 7 Day Natural Weight Loss Plan By Celebrity Fitness Guru Miki Mehta Natural Weight Loss Plan How to naturally lose weight fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.