प्रोटीन आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे असतात. मांसपेशी, हाडं, त्वचा आणि केसांना मजबूत ठेवण्यासाठी शरीराल प्रोटीन आवश्यक असते. शरीरात प्रोटीनची कमतरता भासल्यास केस गळणं, केस तुटणं, त्वचेच्या समस्या इत्यादी समस्या उद्भवू शकतात (Top 5 Protein Food). प्रोटीनसाठी मांसाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी शाकाहारी लोकांनी प्रोटीन मिळवण्यासाठी नेमकं काय खावं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर तुम्ही शाकाहारी पदार्थ खाऊन प्रोटीन मिळवणार असाल तर या लेखात असे काही सहज उपलब्ध होणारे कमी खर्चातले पर्याय पाहूया. ज्यामुळे शरीरात प्रोटीन्सची कमतरता उद्भवणार नाही. ( Veg Protein Source Suggest By Doctor)
मोड आलेले मूग
गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर पाल मणिकम यांनी इंस्टग्राम अकाऊंवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर तुम्ही स्प्राऊटेट मूड डाळीचे सेवन करू शकता. डॉक्टर पाल सांगतात की १०० ग्रॅम मोड आलेल्या ७ ग्रॅम प्रोटीन असते. ज्यामुळे पचनक्रियेशी संबंधित समस्यांवर आराम मिळतो.
टोफू
शरीरासाठी टोफूचे सेवन बरेच फायदेशीर ठरते. टोफू खाल्ल्यानं हाडं, मांसपेशी मजबूत राहण्यास मदत होते तसंच वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. डॉक्टर पाल यांच्यामते १०० ग्रॅम टोफूममध्ये ८ ग्रॅम प्रोटीन असते. शाकाहारी लोक टोफूचे नियमित सेवन करू शकतात.
ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्ट पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय ग्रीक योगर्ट प्रोटीनचा चांगला स्त्रोतसुद्धा आहे. १०० ग्रॅम ग्रीक योगर्टमध्ये १० ग्रॅम प्रोटीन असते. रोजच्या जेवणात तुम्ही ग्रीक योगर्टचा समावेश करू शकता.
लो फॅट पनीर
डॉक्टर पाल यांच्यामते १०० ग्रॅम लो फॅट पनीरमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते. हे खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. इम्यूनिटी वाढते आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. व्हेजिटेरियन लोक आपल्या आहारात लो फॅट पनीरचा समावेश करू शकतात.
टेम्पेह
हा एक इंडोनेशियाई खाण्याचा पदार्थ आहे. ज्यापासून सोयाबीन बनवले जाते. डॉक्टर पाल सांगतात की १०० ग्रॅम टेम्पेहमध्ये जवळपास १९ ग्रॅम प्रोटीन असते. शरीरातील प्रोटीन वाढवण्यासाठी टेम्पेह फायदेशीर ठरते.
