Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > शिस्तीत डाएट-व्यायामही करताय, तरी वजन वाढतंय? तुम्ही हमखास ‘या’ ५ चुका करताय...

शिस्तीत डाएट-व्यायामही करताय, तरी वजन वाढतंय? तुम्ही हमखास ‘या’ ५ चुका करताय...

5 reasons why you are gaining weight despite exercise & healthy diet : 5 Reasons You're Growing Fat Despite the Diet and Exercise : कोणत्या ५ कॉमन चुकांमुळे आपले वजन वाढते ते पाहा, आणि आजपासून या चुका करणे टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 18:39 IST2025-02-17T18:26:35+5:302025-02-17T18:39:01+5:30

5 reasons why you are gaining weight despite exercise & healthy diet : 5 Reasons You're Growing Fat Despite the Diet and Exercise : कोणत्या ५ कॉमन चुकांमुळे आपले वजन वाढते ते पाहा, आणि आजपासून या चुका करणे टाळा...

5 reasons why you are gaining weight despite exercise & healthy diet 5 Reasons You're Growing Fat Despite the Diet and Exercise | शिस्तीत डाएट-व्यायामही करताय, तरी वजन वाढतंय? तुम्ही हमखास ‘या’ ५ चुका करताय...

शिस्तीत डाएट-व्यायामही करताय, तरी वजन वाढतंय? तुम्ही हमखास ‘या’ ५ चुका करताय...

वाढत जाणारे वजन ही आजकाल एक कॉमन समस्याचं झाली आहे. वाढणारे वजन कमी करण्यासाठी सगळेचजण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात. कुणी जिम, कुणी योगा तर कुणी डाएट, झुंबा,अ‍ॅरोबिक्स अशा अनेक अ‍ॅक्टिव्हिटी करतात. अनेकदा एक्सरसाइज किंवा योग्य डाएट फॉलो करुन देखील आपले वजन कमी होतंच नाही. अशावेळी एवढी मेहनत करुन देखील वजन काटा जसाच्या तसाच एकाच जागी स्थिर राहिला की कष्ट वाया गेले असे वाटते(5 Reasons You're Growing Fat Despite the Diet and Exercise).

आपल्यापैकी बऱ्याचजणांना असा अनुभव आला असेल की, वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज आणि डाएट अतिशय काटेकोर पद्धतीने फॉलो करून देखील आपले वजन कमी होण्याऐवजी वाढत जाते. परंतु वजन वाढणे हे केवळ एक्सरसाइजचा अभाव किंवा योग्य पद्धतीने डाएट न केल्यासचं होते असे नाही, तर ते इतर अनेक घटकांवर देखील अवलंबून असते. यासाठीच एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करून देखील जर तुमचे वजन वाढत असेल तर तुम्ही या ५ चुका (5 reasons why you are gaining weight despite exercise & healthy diet) करत आहात. या ५ चुका कोणत्या ते पाहूयात. 

एक्सरसाइज आणि डाएट करून देखील वजन वाढतंय कारण....  

चूक १ :- जितक्या कॅलरीज बर्न करता त्यापेक्षा जास्त खाणे.  

जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा शरीराला ऊर्जेची गरज भासते. अनेकांना असे वाटते की एक्सरसाइज केल्यानंतर आपण काहीही खाऊ शकतो, कारण एक्सरसाइज करून आपण कॅलरीज बर्न केल्या आहेत. कॅलरीज बर्न केल्या आहेत म्हणजेच आपण आपल्याला हवे ते खाऊ शकतो. पण प्रत्यक्षात, जर तुम्ही एक्सरसाइज करून जितक्या कॅलरीज बर्न केल्या आहेत त्यापेक्षा जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. वजन वाढू नये यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. योग्य प्रमाणात पोषक तत्व असणारे अन्नपदार्थ खावेत. फळं आणि ड्रायफ्रुटस यांसारखे हाय फायबर असणारे पदार्थ खावेत. कोणताही पदार्थ खाताना त्याच्या कॅलरीज मोजा त्यानुसार एक्सरसाइज करुन आपण किती कॅलरीज बर्न करतो याचा अंदाज घ्या व त्या प्रमाणे किती कॅलरीज असणारे अन्नपदार्थ खावेत याची योग्य आखणी करा.   

भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

चूक २  :- शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढणे.

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढणे हे देखील वजन वाढण्याचे एक मुख्य कारण असू शकते. बहुतेकवेळा एक्सरसाइज केल्यानंतर आपण भरपूर प्रमाणांत पाणी पितो किंवा जास्त सोडियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने देखील वजन वाढू शकते. पाणी पिणे महत्वाचे आहेच, परंतु ते योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पिणे आवश्यक आहे. शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यासाठी, केळी आणि नारळ पाणी यासारखे पोटॅशियमयुक्त पदार्थ जास्त प्रमाणांत खा. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा, कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. शरीरात पाण्याचे संतुलन राखण्यासाठी नियमितपणे हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग करा. 

कंबर आणि मागचा भाग काही केल्या कमी होत नाही? ४ उपाय-काही दिवसात दिसेल फरक...

चूक ३ :- पुरेशा झोपेचा अभाव. 

झोपेचा वजन वाढण्याशी थेट संबंध असतो. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर तुमच्या शरीरातील चयापचय क्रियेचा वेग मंदावतो, ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यात अडथळा निर्माण होतो. याशिवाय, पुरेशी झोप झाली नाही तर आपल्या शरीरातील भूक लागण्याच्या हार्मोन्समध्ये फार बदल होऊन ते वाढतात, ज्यामुळे वजन जलद गतीने वाढते. यासाठी दररोज कमीत कमी ७ ते ८ तास चांगली झोप घ्या. झोपण्यापूर्वी कॅफिन आणि स्क्रीन टाइम टाळा. झोपण्याची आणि उठण्याची निश्चित वेळ ठरवा. योग आणि ध्यान यासारख्या पद्धतींद्वारे तुमचे मन शांत ठेवा, जेणेकरून झोपेची गुणवत्ता सुधारू शकेल.

चूक ४ :- वजन कमी करताना येणारे रिझल्ट ट्रॅकिंग न करणे. 

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत जे रिझल्ट आपल्याला मिळतात किंवा जे बदल आपल्या शरीरात होतात त्यांचे ट्रॅकिंग करणे देखील गरजेचे असते. बरेच लोक ट्रॅक न करता एक्सरसाइज करत राहतात, परंतु याचा आपल्या शरीरावर किती परिणाम होत आहे हे आपल्याला काहीवेळा कळत नाही. कधीकधी वजन कमी होत नाही, परंतु मसल्स वाढतात ज्यामुळे वजन जास्त दिसते. आठवड्यातून किमान एकदा स्वतःच्या शरीरात दिसणारे बदल वहीत नोंदवून ठेवा. वजनासोबतच, कंबर, मांडी आणि हाताचा आकार यासारखे मोजमाप देखील नोंदवा. तुमचा आहार, व्यायाम आणि वजन कमी कारण्याच्या प्रक्रियेतील परिणाम किंवा  शरीरात दिसणारे बदल डायरी किंवा अ‍ॅपमध्ये नोंदवा. 

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

चूक ५ :- जास्त स्ट्रेस घेणे. 

वजन वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ताणतणाव. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाच्या तणाव संप्रेरकाची पातळी वाढते. या संप्रेरकामुळे भूक वाढते आणि तुम्हाला जास्त कॅलरीज आणि जंक फूड खाण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे वजन वाढते. यासाठी, ताण कमी करण्यासाठी, योगासने, ध्यान करा. नियमितपणे फिरायला जा आणि स्वतःसाठी वेळ काढा. आराम करा आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये थोडा बदल करुन आराम करा.

Web Title: 5 reasons why you are gaining weight despite exercise & healthy diet 5 Reasons You're Growing Fat Despite the Diet and Exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.