सध्याच्या बदलत्या काळात वाढते वजन ही एक मोठी आणि फार कॉमन समस्या झाली आहे. आपल्यापैकीच बरेचजण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी कुणी डाएट करत, तर कुणी एक्सरसाइज तर कुणी थेट योगा, जिम करणेच पसंत करतात. वजन कमी करण्यासाठी सगळेच आपापल्यापरीने अनेक उपाय ( 5 Common Mistakes When Trying to Lose Weight) करतात, परंतु काहीवेळा इतकी मेहनत करूनही वजन कमी होत नाही, यामुळे नैराश्य येते. "आपण सर्व काही बरोबर करत आहोत, तरीही वजन कमी का होत नाही?" असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. खरंतर, वेटलॉससाठी फक्त डाएट किंवा वर्कआउट (5 Mistakes That Disrupt Fat Loss Journey Know Why After Even Gym You Are Not Losing Weight) पुरेसं नसतं. काही अशा छोट्या - मोठ्या सवयी असतात ज्या नकळत आपले वजन कमी करण्याच्या प्रवासात अडथळा निर्माण करु शकतात( Not losing weight despite diet and exercise? Check out these 5 weight loss blunders you may be doing).
पोषणतज्ज्ञ लिमा महाजन यांनी नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. लिमा महाजन यांच्यामते, आपण वेटलॉस करताना महत्त्वाच्या चुका वारंवार करतो, ज्या वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला थांबवतात. या चुका ओळखून तुम्ही तुमचं वेटलॉस करण्याचं लक्ष्य अगदी सहज गाठू शकता. वेटलॉस करताना ५ मुख्य चुका ज्या टाळल्यास वजन कमी होणं अधिक सोपं आणि परिणामकारक ठरू शकतं, या चुका कोणत्या ते पाहूयात.
'या' ५ चुका वारंवार करताय, म्हणून वजन काही केल्या कमीच होत नाही....
चूक १ :- अन्नपदार्थ किंवा जेवण जलद गतीने पटापट खाणे.
लिमा महाजन यांच्या मते, आपल्या मेंदूला हे समजायला सुमारे २० मिनिटे लागतात की पोट भरलं आहे. पण जर तुम्ही जेवण केवळ १० मिनिटांत संपवलंत, तर तुमच्या शरीराला "थांबा" असं सांगण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीच गरजेपेक्षा जास्त खात असता. यासाठी 'माइंडफुल ईटिंग' म्हणजेच जाणीवपूर्वक, हळूहळू खाण्याची सवय लावा. प्रत्येक घास किमान ३० वेळा चावा आणि दोन घासांच्यामध्ये काही सेकंद थांबा. यामुळे पचनही सुधारेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे...
चूक २ :- जेवणापूर्वी पाणी न पिणे.
अनेकवेळा असे होते की आपण तहान आणि भूक यामधला फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे आपण गरज नसतानाही जास्त खाणे टाळू शकत नाही आणि यामुळे अनावश्यक कॅलरीज आपल्या शरीरात जातात. यासाठीच, जेवणाच्या २० ते ३० मिनिटे आधी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील काही प्रमाणात कॅलरीज देखील बर्न होतात. दरवेळी जेवणाच्या साधारण अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा, यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसही मदत होईल.
चूक ३ :- पुरेशी झोप न घेणे.
६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास तुमच्या भुकेशी संबंधित हार्मोन्सचा ताळमेळ बिघडतो, ज्यामुळे खाण्याची इच्छा (क्रेव्हिंग) वाढते आणि याचा थेट परिणाम वजन वाढीवर होतो. वजन कमी करण्यासाठी आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान ७ ते ८ तासांची पुरेशी आणि शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक असते. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) सुधारते आणि शरीरातील फॅट्सचे प्रमाण सहजपणे कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला उपमा खावा की पोहेच चांगले? पाेहे की उपमा-हे घ्या उत्तर...
चूक ४ :- दिवसभर पुरेशी हालचाल न करणे.
फक्त व्यायाम करणेच महत्त्वाचे नसते, तर तुम्ही दिवसभरात किती हालचाल करता यावरही वजन कमी होणे अवलंबून असते. चालणे, घराची स्वच्छता करणे, उभे राहणे, घरकाम करणे या साध्या क्रियांमुळेही कॅलोरीज अगदी सहजपणे बर्न होतात. यासाठीच व्यायामासोबतच दिवसभर शक्य तितकं चालणं, जिने चढणं, दर तासाभराने स्ट्रेचिंग करणं या गोष्टींचा सराव करा. यामुळे तुमचं मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह राहील आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया आणखी वेगाने होईल.
चूक ५ :- कायम स्ट्रेसमध्ये राहणे.
सतत तणावात राहिल्यास शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो, जो शरीरात विशेषतः पोटाच्या भागात चरबी साठवतो यामुळे वजन वाढते. तणावामुळे सतत काही ना काही खाण्याच्या क्रेव्हिंग्स वाढतात, झोपेची गुणवत्ता खराब होते तसेच पचनक्रिया आणि मेटाबॉलिझमचा वेग मंदातो. याचा थेट परिणाम वजन वाढीवर होतो. तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज केवळ ५ ते १० मिनिटे श्वसनाचे एक्सरसाइज करा याचबरोबर वॉकिंग करणे देखील फायदेशीर ठरेल.