आरशात पाहिल्यानंतर जेव्हा पोटाची वाढलेली ढेरी आणि कंबरेचा घेर सर्वात आधी नजरेत पडतो, तेव्हा नकळत मनात टेन्शन येतं. बसून काम करण्याची सवय, अनियमित आहार, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे पोटावर चरबी साचू लागते. त्यामुळे केवळ दिसण्यातच बदल होत नाही, तर आत्मविश्वासावरही परिणाम होतो. आहे. पोटाची वाढती ढेरी फक्त आपल्या सौंदर्यात अडथळा ठरत नाही, तर ती अनेक गंभीर आजारांनाही निमंत्रण देते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण तासंतास जिममध्ये घाम गाळतो किंवा क्रश डाएटची ,मदत घेतो, पण तरीही कित्येकवेळा आपल्याला हवा तसा मनासारखा परिणाम दिसत नाही(4 easy tips to reduce weight and belly fat).
'पोट कसं कमी करायचं?' या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण महागड्या जिमपासून कडक डाएटपर्यंत सर्व काही करून पाहतो. अशा वेळी निराश न होता, आपल्या स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण पोटावरील हट्टी चरबी झटपट विरघळवू शकता. अनेकांना असं वाटतं की, पोट कमी करणं म्हणजे जेवण सोडणं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट, योग्य वेळी आणि योग्य नैसर्गिक पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्यास पोटाची चरबी वेगाने कमी होऊ शकते. सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा आणि राधिका गोयल यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, आहार आणि लाईफस्टाईलमधील काही छोटे (how to lose belly fat naturally at home) बदल तुम्हाला मोठा फरक दाखवू (simple ways to reduce belly fat quickly) शकतात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
वाढलेली पोटाची ढेरी आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी...
१. दिवसभर कोमट पाणी पिणे हा वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय आहे. आपण दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी नक्कीच प्यायले पाहिजे. कोमट पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वेगवान होते आणि शरीराला फॅट बर्निंग करणं देखील सोप होत.
१० दिवस गुळाचा चहा प्या-तब्येतीत दिसतील ५ बदल, चहा प्या आणि करा स्वत:चा मेकओव्हर...
२. शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी देखील कोमट पाणी मदत करू शकते. अशा परिस्थितीत कोमट पाणी आवर्जून प्या. कंबर आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी पाण्यात हळद आणि आले उकळून प्या. हळद आणि आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे दोन्ही पदार्थ शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. इंफ्लेमेशनमुळे शरीर फुगल्यासारखे दिसते, त्यामुळे ते कमी करणे खूप गरजेचे आहे.
३. ज्या लोकांना सतत बद्धकोष्ठतेचा (constipation) त्रास होतो, त्यांच्या शरीरात खूप टॉक्सिन्स जमा होऊ लागतात आणि वजन वाढू लागते. तूप घातलेले पाणी बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. कोमट पाण्यात तूप घालून प्या. यामुळे पोट सहज साफ होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. तुम्हाला १ टी - स्पूनपेक्षा जास्त तूप घ्यायचे नाही. यामुळे देखील बेली फॅट कमी करण्यास मदत होईल, कारण पोट साफ राहील.
४. जेवणापूर्वी साधारण अर्धा तास आधी ॲपल सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्यायचे आहे. यामुळे पोटावरची हट्टी चरबी कमी होते आणि शरीरात साचलेले फॅट विरघळते. ब्लड शुगर कमी करण्याचा आणि मेटाबॉलिझम नियंत्रित करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
५. डाळी आणि भाज्यांमध्ये आलं आणि लसणाचा वापर भरपूर प्रमाणात नक्की करा. यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते.
Web Summary : Reduce belly fat with simple water remedies! Drink warm water, add turmeric and ginger, or ghee for constipation. Apple cider vinegar before meals also helps. Use ginger and garlic in your diet for weight loss.
Web Summary : पेट की चर्बी को सरल पानी के उपायों से कम करें! गर्म पानी पिएं, हल्दी और अदरक मिलाएं, या कब्ज के लिए घी का उपयोग करें। भोजन से पहले एप्पल साइडर विनेगर भी मदद करता है। वजन घटाने के लिए अपने आहार में अदरक और लहसुन का प्रयोग करें।