Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ३० मिनिटं योगासनं की ३० मिनिटं मॉर्निंग वॉक, पाहा वजन कशानं जास्त लवकर कमी होतं!

३० मिनिटं योगासनं की ३० मिनिटं मॉर्निंग वॉक, पाहा वजन कशानं जास्त लवकर कमी होतं!

Weight Loss Tips : काहींना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी ३० मिनिटं चालणं योग्य ठरेल की, योगा करणं? वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ठरते ती म्हणजे कॅलरी बर्न करणं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:31 IST2025-08-01T11:13:09+5:302025-08-01T13:31:54+5:30

Weight Loss Tips : काहींना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी ३० मिनिटं चालणं योग्य ठरेल की, योगा करणं? वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ठरते ती म्हणजे कॅलरी बर्न करणं.

30 minute Yoga or walking what is the best for weight loss | ३० मिनिटं योगासनं की ३० मिनिटं मॉर्निंग वॉक, पाहा वजन कशानं जास्त लवकर कमी होतं!

३० मिनिटं योगासनं की ३० मिनिटं मॉर्निंग वॉक, पाहा वजन कशानं जास्त लवकर कमी होतं!

Weight Loss Tips : वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, फिट राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी किंवा असंही म्हणुया की, परफेक्ट दिसण्यासाठी महिला असो वा पुरूष वेगवेगळ्या गोष्टी करतात. चालणं, धावणं, सायकलिंग, योगा, स्वीमिंग अशा वेगवेगळ्या अ‍ॅक्टिविटी लोक करत असतात. महत्वाची बाब म्हणजे या गोष्टींनी शारीरिक आरोग्य तर चांगलं राहतंच, सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. पण असेही काही लोक आहेत ज्यांना या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. काहींना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी ३० मिनिटं चालणं योग्य ठरेल की, योगा करणं? 

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ठरते ती म्हणजे कॅलरी बर्न करणं. यासाठी मग आपण योगा करा, वॉक करा किंवा रनिंग करा. उद्देश हाच हवा की, कॅलरी बर्न व्हाव्यात. आता व्यायामाच्या प्रकारानुसार या कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण ठरतं.

आपल्याला जर केवळ शरीरातील चरबी कमी करायची असेल तर यासाठी योगा फायदेशीर ठरेल की वॉक? असा प्रश्न असेल तर दोन्हींचे फायदे माहीत असणं गरजेचं आहे.

योगा करण्याचे फायदे

भारतात फार पूर्वीपासून योगाभ्यास केला जातो. योगाच्या माध्यमातून शरीरातील वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास आणि फिट राहण्यास मदत मिळते. योगा केल्यानं शरीराची शक्ती वाढते, लवचिकता वाढते आणि तणावही दूर होतो. इतकंच नाही तर वजन कमी करण्यासही योगा मदत करतो. 

- योगा केल्यानं स्नायू मजबूत होतात आणि त्यांचा आकार वाढतो. तसेच शरीराची लवचिकताही वाढते.

- योगाभ्यास केल्यानं खेळांमध्ये प्रदर्शन सुधारण्यास मदत मिळते.

- योगामुळे स्ट्रेस कमी होतो आणि चांगली झोप लागते.

- नियमितपणे योगा केल्यास वजन कमी होतं आणि कंट्रोलमध्ये राहतं.

- नेहमी योगा केल्यास पाठदुखी, कंबरदुखी, जॉइंट्समधील वेदना दूर होण्यास मदत मिळते.

३० मिनिट योगानं किती कॅलरी कमी होतात?

आता महत्वाचा मुद्दा आहे की, ३० मिनिटं योगा करून किती कॅलरी कमी होऊ शकतात. हार्वर्ड हेल्थच्या एका रिपोर्टनुसार, १५५ पाउंडच्या व्यक्तीनं ३० मिनिटं हट योगा केल्यास १४४ कॅलरी, १८५ पाउंडच्या व्यक्तीच्या १६८ कॅलरी आणि १२५ पाउंडच्या व्यक्तीच्या साधारण १२० कॅलरी बर्न होऊ शकतात.

वॉक करण्याचे फायदे

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वॉक करणं हा एक सगळ्यात परफेक्ट आणि सोपा व्यायाम मानला जातो. रोज काही मिनिटं वॉक करून शारीरिक आणि मानसिक आरोग्यं चांगलं राहू शकतं. अशात रोज चालण्याचे काय काय फायदे होतात हे पाहुयात...

- रोज जर ३० मिनिटं पायी चालाल तर हाय बीपी आणि बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.

- जर आपण खूप जास्त तणावात राहत असाल, तर रोज वॉक कररणं फार गरजेचं आहे. असं केल्यानं मन शांत राहत आणि मूडही चांगला राहतो.

- वजन कमी करण्यासाठी पायी चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम मानला जातो. कारण यात वेगळी काही मेहनत करावी लागत नाही.

- जेवण झाल्यावर चालल्यानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो.

- नियमितपणे पायी चालाल तर जॉइंट्समधील वेदना कमी होतात. ज्यामुळे हाडांसंबंधी ऑस्टियोपोरोसिस आजाराचा धोका कमी होतो.

किती कॅलरी कमी होतील?

टीओआयच्या एका रिपोर्टनुसार, तसं कॅलरी बर्न करणं फिटनेस, स्पीड, वजन या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. पण शरीराचं वजन आणि चालण्याचा स्पीडनुसार सांगायचं तर जवळपास ३ मैल प्रति तासांत एक व्यक्ती १७० कॅलरी बर्न ररू शकते. ब्रिस्क वॉकमध्ये एक व्यक्ती १७५ कॅलरी बर्न करू शकते. जास्त वेगानं चालाल तर १५० ते २२० कॅलरी बर्न होऊ शकतात.

Web Title: 30 minute Yoga or walking what is the best for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.