lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > काय तर म्हणे नान बेडशीट! नेटिझन्स म्हणतात, आता काय पोळ्यांवर झोपायचे का? व्हायरल फोटो

काय तर म्हणे नान बेडशीट! नेटिझन्स म्हणतात, आता काय पोळ्यांवर झोपायचे का? व्हायरल फोटो

अभिनेत्री पद्मालक्ष्मीने शेअर केलेल्या फोटोवरुन नेटीझन्सनी तिलाच केले ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 11:29 AM2021-12-18T11:29:09+5:302021-12-18T11:35:43+5:30

अभिनेत्री पद्मालक्ष्मीने शेअर केलेल्या फोटोवरुन नेटीझन्सनी तिलाच केले ट्रोल

What a naan-bedsheet! Netizens say, why sleep on the Naan now? Viral photo | काय तर म्हणे नान बेडशीट! नेटिझन्स म्हणतात, आता काय पोळ्यांवर झोपायचे का? व्हायरल फोटो

काय तर म्हणे नान बेडशीट! नेटिझन्स म्हणतात, आता काय पोळ्यांवर झोपायचे का? व्हायरल फोटो

Highlightsअसं आगळंवेगळं नान बेडशीट तुम्ही कधी पाहिलंय? नेटीझन्सच्या एकाहून एक भन्नाट कमेंटस वाचा तर खरं

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कधी नोटीझन्स कोणाला ट्रोल करतील याचा कोणीच अंदाज लावू शकत नाही. अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत आयुष्यातील गोष्टी अपडेट करत असतात. काही ना काही अपडेट केल्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल असे त्यांना वाटते खरे. पण अनेकदा त्यांनी केलेल्या पोस्टमुळे त्यांनाच ट्रोल केले जाते. सोशल मीडिया ही सध्या सगळ्यांसाठीच एकदम हॅपनिंग प्लेस झाली असून तिथए सतत काही ना काही घडत असते. कधी याठिकाणी आपले मनोरंजन करणाऱ्या गोष्टी असतात तर कधी पोट धरुन हसायला लावणाऱ्या. काही पोस्टमुळे नकळत आपल्या डोळ्यात पाणी तरळते तर काही पोस्ट आपल्याला विचार करायला लावणाऱ्या असतात. यामध्ये कधी मिम्स असतात, कधी फोटो तर कधी भन्नाट व्हिडियो, गेल्या काही काळापासून रिल्सही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.  

प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल पद्मा लक्ष्मी हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने एका बेडवर टाकलेल्या बेडशीटचा आणि दोन उशांचा फोटो टाकला आहे. या बेडशीटवरील डिझाइन साधीसुधी नसून ती आपण हॉटेलमध्ये जे नान खातो त्याची आहे.आता नानचे डिझाइन असलेल्या ‘या बेडशीटवर झोपायचे का’, ‘सकाळी झोपेतून उठल्यावर तूच ते नान खा’ ‘मला असे बेडशीट दिले तर मी सगळे खाऊनच टाकेन ’अशा एकाहून एक भन्नाट कमेंटस केल्या आहेत. पद्मा लक्ष्मी हिचा या बेडशीटशी काहीही संबंध नसून तिने फक्त हा फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केला असल्याने नेटीझन्सनी तिलाही ट्रोल केले आहे. ‘या बेडवर झोप येणार नाही तर सतत भूक लागेल’, ‘मी काही वेळापूर्वीच खाल्लेले पनीर आणि नान मला आठवत आहे’ यांसारख्या कमेंटस नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहेत. 

आता बेडशीट आणि उशांचे कव्हर आणि त्यावरील डिझाइन हा काय चर्चेचा विषय असू शकतो का, पण सध्या सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की नेटीझन्स सोशल मीडियाचा वापर तर करतातच पण अशाप्रकारे कोणी काही केले की त्यांना ट्रोल करणे सोडत नाहीत. पद्मा लक्ष्मी ही केवळ अभिनेत्री नसून लेखिका म्हणूनही तिची ओळख आहे. वयाच्या १८ व्या वर्षी पद्मालक्ष्मी हिने आपल्या करीयरची सुरुवात केली आणि २००३ मध्ये पद्मा हिने बूम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कतरीना कैफ हिचाही हा पहिलावहिला चित्रपट होता. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यामध्ये प्रमुख भूमिका केली होती. 


 

 

Web Title: What a naan-bedsheet! Netizens say, why sleep on the Naan now? Viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.