Lokmat Sakhi >Social Viral > आईस्क्रीमवर कोथिंबीर चटणी... सांगा, असं आईस्क्रीम कुणी खातं का? पाहा कसं दिसतंय..

आईस्क्रीमवर कोथिंबीर चटणी... सांगा, असं आईस्क्रीम कुणी खातं का? पाहा कसं दिसतंय..

Social viral: अरे आता तरी असे प्रयोग करणं थांबवा रे.... असं आईस्क्रिमचे (ice cream with coriander) दर्दी चाहते ओरडून ओरडून सांगत आहेत... त्याला कारणही तसंच आहे.. बघा हे आहे त्याचं मुख्य कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 01:10 PM2022-02-24T13:10:08+5:302022-02-24T13:11:22+5:30

Social viral: अरे आता तरी असे प्रयोग करणं थांबवा रे.... असं आईस्क्रिमचे (ice cream with coriander) दर्दी चाहते ओरडून ओरडून सांगत आहेत... त्याला कारणही तसंच आहे.. बघा हे आहे त्याचं मुख्य कारण...

Weird food combination: mcdonald launches coriander ice cream, Viral on social media, netizens said stop this experiments | आईस्क्रीमवर कोथिंबीर चटणी... सांगा, असं आईस्क्रीम कुणी खातं का? पाहा कसं दिसतंय..

आईस्क्रीमवर कोथिंबीर चटणी... सांगा, असं आईस्क्रीम कुणी खातं का? पाहा कसं दिसतंय..

HighlightsMcDonald या नामांकित कंपनीने हा प्रयोग केला असून हे आईस्क्रिम थोड्याच दिवसांसाठी बाजारात असणार आहे, असंही McDonald तर्फे सांगण्यात आलं आहे.

आईस्क्रिम म्हणजे अनेक लोकांचा विक पाॅईंट. त्यात आता तर उन्हाळा येऊ लागला आहे. त्यामुळे दररोज आईस्क्रिमवर तुटून पडणारी जनता आता ठिकठिकाणी दिसणार. प्रत्येक पदार्थाची जशी एक चव ठरलेली असते, तशीच आईस्क्रिमचीही आहे. पण काही हौशी शेफ मात्र आईस्क्रिमवर (experiments on ice cream) पुरेपूर प्रयोग करून बघत आहेत.. आईस्क्रिमवर होणारे हे अत्याचार मात्र खऱ्या आईस्क्रिम लव्हर्सला आता बघवत नाहीयेत.

 

त्यामुळे आईस्क्रिमची तिच चव कायम राहू द्या. तुमचे अचाट, अतरंगी प्रयोग आता तरी आईस्क्रिम बाबत करू नका, असं आईस्क्रिम प्रेमींचं म्हणणं आहे. सोशल मिडियावर (social media) सध्या weird food combinations चं भलतंच वारं वाहू लागलं आहे. कोणत्याही वेगवेगळ्या चवीच्या पदार्थांचं विचित्र कॉम्बिनेशन करायचं आणि ते खवय्यांना खायला द्यायचं.. यातूनच तर मॅगी आईस्क्रिम, वडापाव आईस्क्रिम असं काहीही बघायला मिळतं आहे..

 

आता याच्याच पुढचं पाऊल म्हणता येईल असं एक आईस्क्रिम सध्या चीनच्या बाजारात आलं आहे. McDonald या नामांकित कंपनीने हा प्रयोग केला असून हे आईस्क्रिम थोड्याच दिवसांसाठी बाजारात असणार आहे, असंही McDonald तर्फे सांगण्यात आलं आहे. हे आईस्क्रिम चक्क कोथिंबीरीपासून बनवलं आहे. पोहे, उपमा किंवा एखादी भाजी पानात वाढून घेतल्यानंतर आपण त्या पदार्थावर जशी कोथिंबीरीची पेरणी करतो, तशीच या आईस्क्रिमवर कोथिंबीर टाकली जाते. एवढंच नाही, तर त्यावरून लिंबाचा सॉस टाकला जातो किंवा मग लिंबू पिळलं जातं.. ndtv ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय चलनाप्रमाणे या एक कप आईस्क्रिमची किंमत ७७ रूपये आहे.

 

Web Title: Weird food combination: mcdonald launches coriander ice cream, Viral on social media, netizens said stop this experiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.