lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > खाणार का बार्बी डोसा? आता हा कोणता नवा प्रकार, गुलाबी डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ

खाणार का बार्बी डोसा? आता हा कोणता नवा प्रकार, गुलाबी डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Barbie Dosa: मार्केटमध्ये सध्या जबरदस्त व्हायरल असलेला हा बार्बी डोसा तुम्ही खाऊन पाहिला का? त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.(How to make barbie dosa?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 11:55 AM2023-08-30T11:55:21+5:302023-08-30T11:56:58+5:30

Viral Video of Barbie Dosa: मार्केटमध्ये सध्या जबरदस्त व्हायरल असलेला हा बार्बी डोसा तुम्ही खाऊन पाहिला का? त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.(How to make barbie dosa?)

Viral video of barbie dosa, How to make barbie dosa? recipe of barbie dosa | खाणार का बार्बी डोसा? आता हा कोणता नवा प्रकार, गुलाबी डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ

खाणार का बार्बी डोसा? आता हा कोणता नवा प्रकार, गुलाबी डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlightsकाहीतरी वेगळं खायला हवं अशी मुलांची नेहमीच मागणी असते. म्हणून त्यांच्यासाठी किंवा तुमच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून बार्बी डोसा....

साधा डोसा, मसाले डोसा हे आपल्या खूप ओळखीचे. कारण ते आपण खूपदा खाल्लेले आणि आपल्या घरात नेहमीच होणारे. आता त्याच्याही पुढे जाऊन आपण चीज डोसा, पनीर डोसा, शेजवान डोसा असे वेगवेगळे प्रकार खाऊन पाहिले आहेत. आवडलेले डोसे प्रकार घरीही करून पाहिले आहेत. पण आता मात्र एक वेगळाच डोसा सोशल मिडियावर गाजतो आहे आणि तो म्हणजे बार्बी डोसा(How to make barbie dosa?).. तुम्ही पाहिला का बार्बी डोसा करण्याचा हा भन्नाट व्हायरल प्रकार?(recipe of barbie dosa)

 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या universal_exploring या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जो डोसा तयार होताना दिसत आहे, तो चक्क गुलाबी रंगाचा आहे. आता गुलाबी रंग हा बार्बीचा रंग म्हणून ओळखला जातो.

मुलांना ३ खेळ शिकवा, एकाग्रता वाढेल- डोकं होईल सुपीक आणि मोबाइलचं वेडही होईल कमी 

म्हणूनच वाढदिवसाची किंवा एखाद्या सेलिब्रेशनसाठी बार्बीची थीम करताना गुलाबी रंगाच्या फुग्यांचा, पडद्यांचा किंवा केकचा वापर केला जातो. आता या डोशाचा रंग गुलाबी आहे. म्हणूनच त्याला बार्बी डोसा असं नाव दिलं आहे. खरं पाहायला गेलं तर या डोशामध्ये खूप काही वेगळं नाही. फक्त डोशाला गुलाबी रंग यावा म्हणून त्यात बीटरूट टाकलं आहे. डोसा करण्याची अजब ट्रिक पाहून नेटिझन्सची मात्र चांगली करमणूक झाली आहे. हा डोसा पाहून एकाने तर चक्क मला Oppenheimer डोसा पाहिजे, अशी मागणी केली आहे. 

 

बार्बी डोसा करण्याची रेसिपी
काहीतरी वेगळं खायला हवं अशी मुलांची नेहमीच मागणी असते. म्हणून त्यांच्यासाठी किंवा तुमच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून बार्बी डोसा करायचा असेल तर नेहमीप्रमाणे डोशाचं पीठ तयार करून घ्या.

विळी न वापरता नारळ खोवण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, भराभर नारळ खोवून करा नारळीपौर्णिमा साजरी

त्यात बीटरुटची मिक्सरमधून फिरवलेली प्यूरी टाका. गुलाबी रंगाचं पीठ तयार होईल, त्याचे छानसे गुलाबी रंगाचे बार्बी डोशे करा. 

 

Web Title: Viral video of barbie dosa, How to make barbie dosa? recipe of barbie dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.