Lokmat Sakhi >Social Viral > बहिणीला गणित शिकवता शिकवता बिचारा भाऊच रडू लागला; पाहा घाबरवणाऱ्या गणिताचा व्हायरल व्हिडिओ

बहिणीला गणित शिकवता शिकवता बिचारा भाऊच रडू लागला; पाहा घाबरवणाऱ्या गणिताचा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Boy Crying While Teaching Math To Younger Sister : त्याच्या रडण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओला ‘अतिशय दु:खाची बाब आहे’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 01:49 PM2022-10-28T13:49:40+5:302022-10-28T13:51:58+5:30

Viral Video Boy Crying While Teaching Math To Younger Sister : त्याच्या रडण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओला ‘अतिशय दु:खाची बाब आहे’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

Viral Video Boy Crying While Teaching Math To Younger Sister : While teaching mathematics to his sister, the brother began to cry; Watch a viral video of scary math | बहिणीला गणित शिकवता शिकवता बिचारा भाऊच रडू लागला; पाहा घाबरवणाऱ्या गणिताचा व्हायरल व्हिडिओ

बहिणीला गणित शिकवता शिकवता बिचारा भाऊच रडू लागला; पाहा घाबरवणाऱ्या गणिताचा व्हायरल व्हिडिओ

Highlightsया मुलाची आपल्या बहिणीला गणित समजावण्याची धडपड आणि तिला समजत नसल्याने त्याला येणारी निराशा या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते. हा व्हिडिओ शूट करणारी या मुलांची आई म्हणते की तू शिक्षक होऊ शकत नाहीस कारण तू लगेच निराश होतोस.

घरात लहान बहिण-भावंड असली की त्यांची बरीचशी जबाबदारी नकळात मोठ्या भावंडांकडे येते. अगदी खेळताना त्यांच्याकडे लक्ष देण्यापासून ते त्यांना खायला घालणे, पाणी पाजणे अशी कित्येक कामं ही मोठी भावंडं अतिशय आवडीने आणि प्रेमाने करत असतात. हे करताना या दोघांमध्ये भांडणंही होतात, काहीवेळा हे रुसवे-फुगवे बराच काळ टिकतात तर काही वेळा ही लुटूपुटूची भांजणं लगेच मिटतातही. मोठ्या भावाला किंवा बहिणीला लहान भावंडाचा अभ्यास घ्यायला सांगितले जाते. पण काही कारणाने लहान मूल ऐकत नसल्याने मोठे मूल त्याची आईकडे किंवा घरातील कोणाकडे तक्रार करते. मग आईकडून दोघांना काही गोष्टी समजवल्या जातात आणि हे दोघे पुन्हा एकदा अभ्यासाला लागतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक लहान मुलगा आपल्या बहिणीला गणित शिकवत आहे (Viral Video Boy Crying While Teaching Math To Younger Sister).

(Image : Google)
(Image : Google)

 

गणित हा विषय काहींना खूप आवडतो तर काहींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणे हे दिव्य काम असते. शिक्षकही गणित हा विषय विद्यार्थ्यांना समजेपर्यंत शिकवतात. इतकेच नाही तर या विषयासाठी ट्यूशन क्लासही लावावे लागतात. चीनमधील एक लहान मुलगा आपल्या बहिणीला गणित शिकवत असताना तिला ते काही केल्या समजत नसल्याने त्याला अतिशय वाईट वाटले आणि तो रडायला लागला. त्याच्या रडण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओला ‘अतिशय दु:खाची बाब आहे’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. मस्ट शेअर न्यूज या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  


विशेष म्हणजे ही लहानगीही भावाचे रडणे पाहून किंवा तिला इतक्यांदा सांगून कळत नसल्याने रडत आहे. पण भावाला आपले म्हणणे तिला का कळत नाही या कारणाने कदाचित नैराश्य आले असावे म्हणून तो ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ शूट करणारी या मुलांची आई म्हणते की तू शिक्षक होऊ शकत नाहीस कारण तू लगेच निराश होतोस. तिचे हे वाक्यही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाल्याने ऐकू येते. त्यामुळे या मुलाची आपल्या बहिणीला गणित समजावण्याची धडपड आणि तिला समजत नसल्याने त्याला येणारी निराशा या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते. 

Web Title: Viral Video Boy Crying While Teaching Math To Younger Sister : While teaching mathematics to his sister, the brother began to cry; Watch a viral video of scary math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.