Lokmat Sakhi >Social Viral > "आ जाने जा...." म्हणत आजी- आजोबांनी केला रोमॅण्टिक डान्स, बघा व्हायरल व्हिडिओ

"आ जाने जा...." म्हणत आजी- आजोबांनी केला रोमॅण्टिक डान्स, बघा व्हायरल व्हिडिओ

Romantic Dance of a Elderly Couple: जवळपास सत्तरीच्या आसपास वय असणाऱ्या आजी- आजोबांनी केलेला रोमॅण्टीक डान्स सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 01:25 PM2022-11-23T13:25:45+5:302022-11-23T13:26:45+5:30

Romantic Dance of a Elderly Couple: जवळपास सत्तरीच्या आसपास वय असणाऱ्या आजी- आजोबांनी केलेला रोमॅण्टीक डान्स सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Viral Romantic Video: Romantic dance of a elderly couple on old bollywood song | "आ जाने जा...." म्हणत आजी- आजोबांनी केला रोमॅण्टिक डान्स, बघा व्हायरल व्हिडिओ

"आ जाने जा...." म्हणत आजी- आजोबांनी केला रोमॅण्टिक डान्स, बघा व्हायरल व्हिडिओ

Highlightsछोट्या- छोट्या गोष्टीतूनही आयुष्य कसं एन्जॉय करत रहायचं, हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच.

जोडीदारासोबत आयुष्य एन्जॉय करायला किंवा एकमेकांवर भरभरून प्रेम करायला तुमचं वय किती आहे, यापेक्षा तुम्ही मनाने किती तरुण आहात हे जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं असतं. पण काही जण नेमके इथेच कच्चे पडतात तर काही वयस्कर मंडळी मात्र वय वाढूनही कायमच तरुण राहतात. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधल्या (Viral Romantic Video) आजी- आजोबांचंही थाेडंंसं असंच काहीसं दिसतंय. "आ जाने जा...." या जुन्या लोकप्रिय गीतावर त्यांनी असा काही सदाबहार डान्स (Romantic dance of a elderly couple) केला की नेटिझन्स बघतच राहिले..

 

robinnakai या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला 'A love story … in dance and music ..' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

प्रवासात असताना झटपट वर्कआऊट कसं करायचं? वाचा आलिया भटच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

काही दिवसांपुर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एका घरात एक छोटेखानी पार्टी सुरू आहे. टेबलवर वेगवेगळे खाद्य पदार्थ ठेवलेले असून लाईट म्युझिक सुरू आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने पार्टी एन्जॉय करत आहेत. पार्टीमध्ये सहभागी झालेले आजूबाजूचे लोकही या आजी- आजोबांप्रमाणे वयस्करच आहेत. पण या जोडीमध्ये जो चार्म किंवा ग्रेस दिसतोय, तो इतरांमध्ये नाही.


आजूबाजूचे लोक गप्पांमध्ये दंग असताना हे वयस्कर रोमॅण्टीक दाम्पत्य मात्र एकमेकांचे हात हातात घेऊन अतिशय सहज- सुंदर डान्स करत आहे.

त्वचेसाठी एक खास तेल! रोज फक्त २ मिनिटांचा मसाज, त्वचा होईल मुलायम- चमकदार

आजींनी तर नृत्य करताना एका हातात पेय असणारा ग्लासही व्यवस्थित तोलून धरला आहे. आजोबा तर स्मार्ट आहेतच. पण आजींची साडी, हेअरस्टाईल, ज्वेलरी या सगळ्या गोष्टींमुळे या वयातही त्या अतिशय सुंदर दिसत आहेत. छोट्या- छोट्या गोष्टीतूनही आयुष्य कसं एन्जॉय करत रहायचं, हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच.
 

Web Title: Viral Romantic Video: Romantic dance of a elderly couple on old bollywood song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.