lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अरे आवरा हिला! केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी बाईनं इस्त्रीचा केला जुगाड; व्हायरल होतोय Video

अरे आवरा हिला! केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी बाईनं इस्त्रीचा केला जुगाड; व्हायरल होतोय Video

Girl Straightening Hair With Iron : केसांना चांगला लूक येण्यासाठी आणि केस सरळ राहावेत यासाठी अनेक महिला स्ट्रेटनिंग करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 09:38 AM2024-03-29T09:38:18+5:302024-03-29T09:48:48+5:30

Girl Straightening Hair With Iron : केसांना चांगला लूक येण्यासाठी आणि केस सरळ राहावेत यासाठी अनेक महिला स्ट्रेटनिंग करतात.

Video Of Girl Straightening Hair With Iron Goes Viral : Girl Straightening Hair With Irons | अरे आवरा हिला! केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी बाईनं इस्त्रीचा केला जुगाड; व्हायरल होतोय Video

अरे आवरा हिला! केस स्ट्रेटनिंग करण्यासाठी बाईनं इस्त्रीचा केला जुगाड; व्हायरल होतोय Video

जिथे फॅशनचा विषय येतो तिथे अधिकाधिक सुंदर दिसण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. खासकरून महिला फॅशनचे वेगवेगळे  प्रयोग करत असतात. असाच एक एक्सपरिमेंट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हेअर स्ट्रेटनिंगची ही अनोखी पद्धत पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल. ( Video Of Girl Straightening Hair With Irons Goes Viral)

केसांना चांगला लूक येण्यासाठी आणि केस सरळ राहावेत यासाठी अनेक महिला स्ट्रेटनिंग करतात. ही पद्धत बघून अनेकांना  हसू अनावर झाले आहे.  स्ट्रेटनिंग मशिन ही फार महाग असते अशावेळी या महिलेने केलेला जुगाड चर्चेचा विषय ठरत आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

ज्यामध्ये गोल्डन कलरच्या अनारकली सूटमध्ये महिला पार्टीला जाण्यासाठी तयार होत आहे. पार्टीसाठी परफेक्ट लूक यावा यासाठी ही महिला आपले केस स्ट्रेट करत आहे. या महिलेनं कपडे प्रेस करण्याच्या आयर्नला हेअर स्ट्रेटनर बनवले आहे. व्हिडिओमध्ये एका हातात निळ्या रंगाचे कापड आणि दुसऱ्या हातात इस्त्री आहे आणि ही महिला हेअर स्ट्रेट करत आहे.

वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल

सोशल मीडियावर या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत

सोशल मीडियावर हा व्हिडिओ  90 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 11 लाख लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओवर कमेंट करत एका युजरनं लिहिले की असं करत असताना एकदा मी माझे केस जाळून घेतले होते. दुसऱ्याने लिहिलं की माझ्या पत्नीचे हे रोजचे नाटक आहे. आणखी एका युजरने कमेंट केली ही माझी बहिण केस स्ट्रेट करण्यासाठी ही ट्रिक वापरते. 

Web Title: Video Of Girl Straightening Hair With Iron Goes Viral : Girl Straightening Hair With Irons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.