रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना स्टारर 'धुरंधर' हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित ट्रेंड्सचा पूर आला आहे. मग तो 'स्पाय ट्रेंड' असो किंवा व्हायरल झालेलं 'FA9LA' गाणं, सर्वत्र याच गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, FA9LA ट्रेंडशी संबंधित असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने लोकांची मनं जिंकली आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीच्या जन्मानंतर वडिलांनी हॉस्पिटलमध्ये आनंदाने डान्स केला आहे. आपल्या मुलीच्या जन्माची बातमी मिळताच, हा बाबा खूप खूश होतो आणि 'धुरंधर' चित्रपटातील लोकप्रिय 'FA9LA' गाण्यावर डान्स करू लागतो. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ अभिनेत्री यामी गौतमने शेअर केला आहे. यामी गौतम ही धुरंधरचे दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी आहे. लोक 'विनर ऑफ ट्रेंड' म्हणत हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
व्हिडिओची सुरुवात हॉस्पिटलच्या एका खोलीतून होते, जिथे एक महिला नवजात बाळाला कुशीत घेऊन 'FA9LA' गाण्यावर थिरकताना दिसते. मागे असलेले इतर लोकही या आनंदात सहभागी होतात. त्यानंतर कॅमेरा बाहेरच्या बाजूला जातो आणि एक अतिशय भावूक क्षण समोर येतो. येथे वडील आपल्या नवजात मुलीची पहिली झलक पाहून हसत-हसत डान्स करताना दिसतात.
Winner Of The Trend ❤️🔥 pic.twitter.com/7kvPDO03IM
— POSITIVE FAN (@imashishsrrk) December 17, 2025
या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, "तेच बॅकग्राउंड म्युझिक, पण भावना मात्र पूर्णपणे वेगळी! नवजात बाळाच्या एन्ट्रीने हा क्षण अविस्मरणीय बनवला." दुसऱ्या युजरने म्हटलं की, "प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आलं." आणखी एका कमेंटमध्ये लिहिले होतं की, "खऱ्या अर्थाने माणसाला हेच हवं असतं, त्यांचा आनंद बघा."
'धुरंधर' चित्रपटातील 'FA9LA' गाण्यात अक्षय खन्नाची 'रहमान डकैत' ही व्यक्तिरेखा कारमधून उतरून जल्लोषात एन्ट्री करते. हीच एन्ट्री आज सोशल मीडियावर मोठा ट्रेंड बनली आहे. या सीनबद्दल कोरिओग्राफर विजय गांगुलीने सांगितलं होते की, ही एन्ट्री स्वतः अक्षय खन्नाची कल्पना होती. इतकंच नाही तर हा संपूर्ण डान्स सिक्वेन्स फक्त एकाच टेकमध्ये शूट करण्यात आला होता.
