lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी

उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी

24 Carat Gold Cake Worth Rs 3 Crore: बॉलीवूड सेलिब्रिटी उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) सोन्याचा बर्थ डे (birthday) केक नुसता पाहून आणि त्याची किंमत ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले आहे.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2024 12:08 PM2024-02-26T12:08:31+5:302024-02-26T12:09:51+5:30

24 Carat Gold Cake Worth Rs 3 Crore: बॉलीवूड सेलिब्रिटी उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) सोन्याचा बर्थ डे (birthday) केक नुसता पाहून आणि त्याची किंमत ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले आहे.... 

Urvashi Rautela celebrates her birthday by cutting 24 carat gold cake worth Rs 3 Crore | उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी

उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी

Highlights उर्वशी स्पेशल असून ती अशा स्पेशल वस्तूच डिझर्व्ह करते, अशा शब्दांत हनी सिंगने उर्वशीचं कौतूक केलं आहे. 

सोन्याचा राजवाडा आणि त्या राजवाड्यातील सगळ्या वस्तू तसेच खाण्यापिण्याचे सगळे पदार्थही सोन्याचेच, ही गोष्ट लहानपणी सगळ्यांनीच ऐकली असेल. तेव्हा असं वाटायचं की इतर वस्तूंचं ठीक आहे, पण खाण्यापिण्याचे पदार्थ सोन्याचे कसे असू शकतात? हा बालसुलभ प्रश्न बहुतांश बालकांना ती गोष्ट ऐकताना पडतोच. त्याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्या वाढदिवसाचा केक पाहून घ्या (Urvashi Rautela celebrates her birthday). हा केक चक्क २४ कॅरेट सोन्यापासून बनविण्यात आला असून केकची किंमतच तब्बल ३ कोटी रुपये आहे (24 carat gold cake worth Rs 3 Crore). एवढा महागडा केक कापणाऱ्या उर्वशीची चर्चा तर आहेच, पण तिच्यासाठी हा अतिमहागडा केक नेमका कोणी आणला, हा प्रश्नही सर्वसामान्यांना पडला आहे. 

 

उर्वशीने २५ फेब्रुवारीला दणक्यात तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला रॅप गायक हनी सिंग याने तिच्यासाठी हा स्पेशल केक मागवला होता. या केकवर जो मुलामा होता त्यासाठी २४ कॅरेट सोनं वापरण्यात आलं होतं.

कन्सीलर- ब्लश कसं वापरावं कळतच नाही? ५ सोप्या टिप्स, मेकअप दिसेल नॅचरल- सुंदर 

हिरे आणि सोन्याचे मणी लावून ते केक सजवलेला होता. आता हा केक खराखुरा होता की केकची नुसती प्रतिकृती होती, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. पण तो केक अगदी खराखुरा होता आणि तिने तो कापला. एवढेच नाही, तर त्या सोन्याच्या केकचा उर्वशीला घास भरवितानाचा हनी सिंगचा फोटोही व्हायरल झाला आहे. 

 

उर्वशीने ३ कोटी रुपये काही मिनिटांत खाऊन टाकले... अशी मजेशीर प्रतिक्रियाही नेटिझन्सनी दिली आहे. मागच्यावर्षीही उर्वशीच्या वाढदिवसाची अशीच चर्चा झाली होती.

नाश्त्यासाठी करा नाचणीची खमंग- कुरकुरीत पुरी, मुलांच्या डब्यासाठीही सुपरहेल्दी पदार्थ- घ्या रेसिपी

त्यावेळी तिने हिरे जडवलेला केक कापला होता आणि सोन्याचे कप केक्स आणले होते. उर्वशी स्पेशल असून ती अशा स्पेशल वस्तूच डिझर्व्ह करते, अशा शब्दांत हनी सिंगने उर्वशीचं कौतूक केलं आहे. 


 

Web Title: Urvashi Rautela celebrates her birthday by cutting 24 carat gold cake worth Rs 3 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.