lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > नाश्त्यासाठी करा नाचणीची खमंग- कुरकुरीत पुरी, मुलांच्या डब्यासाठीही सुपरहेल्दी पदार्थ- घ्या रेसिपी

नाश्त्यासाठी करा नाचणीची खमंग- कुरकुरीत पुरी, मुलांच्या डब्यासाठीही सुपरहेल्दी पदार्थ- घ्या रेसिपी

How To Make Ragi Puri: नाचणीची भाकरी आवडत नसेल तर मग नाचणीच्या खमंग- कुरकुरीत पुऱ्या करून पाहा. मुलांना डब्यात देण्यासाठीही हा एक परफेक्ट पदार्थ आहे. (Nachani chi poori recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2024 11:35 AM2024-02-26T11:35:11+5:302024-02-26T11:37:34+5:30

How To Make Ragi Puri: नाचणीची भाकरी आवडत नसेल तर मग नाचणीच्या खमंग- कुरकुरीत पुऱ्या करून पाहा. मुलांना डब्यात देण्यासाठीही हा एक परफेक्ट पदार्थ आहे. (Nachani chi poori recipe in marathi)

How to make Ragi Puri, Nachani chi poori recipe in marathi, super healthy breakfast using ragi, perfect food for kids tiffin, easy and simple breakfast menu | नाश्त्यासाठी करा नाचणीची खमंग- कुरकुरीत पुरी, मुलांच्या डब्यासाठीही सुपरहेल्दी पदार्थ- घ्या रेसिपी

नाश्त्यासाठी करा नाचणीची खमंग- कुरकुरीत पुरी, मुलांच्या डब्यासाठीही सुपरहेल्दी पदार्थ- घ्या रेसिपी

Highlightsवेटलॉस करणाऱ्यांसाठी (weight loss) तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी (diabetes) नाचणी अतिशय उत्तम आहे.

इतर धान्यांप्रमाणेच नाचणी हे अतिशय पौष्टिक धान्य आहे. पण अजूनही आहारात आपण त्याचा वापर खूप कमी करतो. गहू, बाजरी, ज्वारी यांच्याप्रमाणेच नाचणीच्याही भाकरी केल्या जातात. आठवड्यातून काही दिवस नियमितपणे नाचणीची भाकरी खाणं आरोग्यासाठीही अतिशय उत्तम आहे. पण नाचणीच्या भाकरीची चव अनेकांना आवडत नाही. म्हणूनच आता नाचणीच्या खमंग- कुरकुरीत पुऱ्या करून पाहा (super healthy breakfast using ragi). नाश्त्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. शिवाय मुलांच्या डब्यासाठीही खूप पौष्टिक आणि विशेष म्हणजे मुलं मनापासून खातील असा आहे (perfect food for kids tiffin). वेटलॉस करणाऱ्यांसाठी (weight loss) तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी (diabetes) नाचणी अतिशय उत्तम आहे. (How to make Ragi Puri)

नाचणीच्या पुऱ्या करण्याची रेसिपी (Nachani chi poori)

 

साहित्य

१ वाटी नाचणीचं पीठ. बाजारात मिळणारं नाचणी सत्वही तुम्ही वापरू शकता.

१ वाटी रवा

१ वाटी कणिक

१ वाटी दही

लग्न- साखरपुड्यासाठी कपल रिंग घ्यायच्या? बघा लेटेस्ट स्टाईलच्या १० सुपर ट्रेण्डी डिझाईन्स...

१ टेबलस्पून आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट

२ टेबलस्पून कोथिंबीर

चवीनुसार मीठ

ना मिक्सर- ना ज्यूसर, ५ मिनिटांत १ किलो संत्री- मोसंबीचा रस तयार, बघा सोपी पद्धत

१ टीस्पून धने- जीरे पूड

पुऱ्या तळण्यासाठी तेल

 

कृती

१. सगळ्यात आधी एका भांड्यात नाचणीचं पीठ, कणिक, रवा आणि दही एकत्र करून घ्या. 

२. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या तसेच कोथिंबीर मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट आता आपल्या पिठात टाका.

कन्सीलर- ब्लश कसं वापरावं कळतच नाही? ५ सोप्या टिप्स, मेकअप दिसेल नॅचरल- सुंदर 

३. धने- जीरे पूड, मीठ घालून थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या. पीठ थोडं घट्टच राहू द्या. तसेच पीठ मळल्यानंतर ते ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. 

४. आता एका कढईमध्ये तेल टाकून ते तापायला ठेवून द्या. मळलेल्या पीठाच्या लहान- लहान आकाराच्या पुऱ्या लाटा. 

५. या गरमागरम पुऱ्या तुम्ही दही, दाण्याची चटणी, लोणचं किंवा टोमॅटो सॉस यांच्यासोबत खाऊ शकता. 

 

Web Title: How to make Ragi Puri, Nachani chi poori recipe in marathi, super healthy breakfast using ragi, perfect food for kids tiffin, easy and simple breakfast menu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.