Lokmat Sakhi >Social Viral > चोरट्यांनी पळवली खाट, कुटुंब म्हणाले, ''शांती मिळणार नाही'' नक्की भानगड काय पाहा..

चोरट्यांनी पळवली खाट, कुटुंब म्हणाले, ''शांती मिळणार नाही'' नक्की भानगड काय पाहा..

Uttar Pradesh Social Viral घरातील खाट चोरीला गेली, असं कधी ऐकलंय का ? उत्तर प्रदेशची अजब घटना सोशल मिडीयावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 04:01 PM2022-12-15T16:01:10+5:302022-12-15T16:53:13+5:30

Uttar Pradesh Social Viral घरातील खाट चोरीला गेली, असं कधी ऐकलंय का ? उत्तर प्रदेशची अजब घटना सोशल मिडीयावर व्हायरल

The thieves ran away the bed, the family said, "There will be no peace". | चोरट्यांनी पळवली खाट, कुटुंब म्हणाले, ''शांती मिळणार नाही'' नक्की भानगड काय पाहा..

चोरट्यांनी पळवली खाट, कुटुंब म्हणाले, ''शांती मिळणार नाही'' नक्की भानगड काय पाहा..

''मढ्याच्या टाळू वरचं लोणी खाणे'' ही म्हण आपण ऐकलीच असेल. एखाद्याच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत लोभापोटी कृत्य करणे. अशी दृश्य आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला देखील मिळाली असेल. उत्तर प्रदेशमध्ये असाच काहीसा अतरंगी प्रकार दिसून आला आहे. ज्यात एक चोरटा घरात चोरी करण्याच्या हेतूने आला तर खरा मात्र, जाता जाता त्याने घरातील मृत व्यक्तीची आवडती खाट देखील चोरून नेली. याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली  असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

तर, ही अजब गजब घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात. काही दिवसांपूर्वी या गावात एका मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीची अंत्यसंस्कार विधी देखील पार पडली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिची आवडती खाट घराच्या बाहेर उलटी लटकवली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार चारपाई खाटामध्ये मुलीचा जीव अडकला आहे. कारण त्यांची मुलगी आपला अधिक वेळ त्या खाटेवरच घालवत असे. त्यामुळे मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी खाट घराच्या बाहेर लटकवली आणि  चोरट्यांनी ती पळवून नेली.

पोलिसांनी लवकरात लवकर मृताची खाट शोधून काढावी, असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी छपरौली पोलीस ठाण्याचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले की, ''मयताची खाट चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच चोरट्यांचा छडा लावला जाईल'', असे आश्वासन पोलिसांकडून कुटुंबीयांना देण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणानंतर सोशल मिडीयावर याचीच जास्त चर्चा होत आहे.

Web Title: The thieves ran away the bed, the family said, "There will be no peace".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.