Join us

Social Viral : 'पैशांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरवेअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:26 IST

Social Viral : आता विकी कौशल (vicky kaushal) आणि रश्मिका मंदाना( Rashmika mandanna) माचो अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत.

बॉलिवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री, अभिनेते आहेत ज्यांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल केलं जातं.  मागच्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा बॉलिवुड स्टार्स ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.  काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशन आणि कटरिना कैफला जोमॅटोच्या जाहिरातीवरून नेटिझन्सच्या संतापचा सामना करावा लागला.  त्यानंतर  ब्रायडल वेअर आणि कन्यादानावरून आलिया भट्ट ट्रोल झाली.

आता विकी कौशल (vicky kaushal) आणि रश्मिका मंदाना( Rashmika mandanna) माचो अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांनाही ट्रोलर्सकडून टार्गेट केलं जात आहे. ट्विटरवर रश्मिका आणि कौशलची चांगली शाळा घेतली जात आहे. युजर्सच्या म्हणण्यानुसार त्यांना ही जाहिरात आवडलेली नाही. 

अशी आहे जाहिरात

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता रश्मिका मंदाना एका योगा इंस्ट्रक्टरच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्याचवेळी डोळे बंद करू योगा करत असलेल्या विकीच्या अंडरवेअरची स्ट्रॅप दिसते. हे पाहून रश्मिका हसते. जाहिरातीच्या नंतरच्या भागात रश्मिका विक्कीला वर ठेवलेल्या वस्तूंपैकी काहीतरी काढायला सांगते. त्यावेळी टी शर्ट वर झाल्यानं पुन्हा विक्कीच्या अंडरवेअरची स्ट्रॅप दिसून येते.

याआधीसुद्धा अंडरवेअरच्या जाहिरातींवर सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त केलेला पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी अंडरवेअरची जाहिरात केल्यानं वरूण धवनलाही युजर्सनी सुनावलं होतं. या दोघांवरही बरेच चाहते नाराज असून एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, अमूल माचोची जाहिरात खूपच वाईट होती. पैशांसाठी काहीही कराल का? अशी कमेंटही एका युजरनं केली आहे.

 रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. इंस्टाग्रामवर रश्मिकाचे 13 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. रश्मिका मंदाना आता लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजून या चित्रपटात झळकणार आहे.  या चित्रपटांच्या कामासाठी रश्मिका सध्या मुंबईला शिफ्ट झाली आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानाविकी कौशलबॉलिवूडजाहिरातसोशल व्हायरल