lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : धक्कादायक! ३० वर्षांपासून ज्यांना स्वत:चे वडील समजत होती ते खरे वडील नव्हतेच; आईचं 'असं' फुटलं भांडं 

Social Viral : धक्कादायक! ३० वर्षांपासून ज्यांना स्वत:चे वडील समजत होती ते खरे वडील नव्हतेच; आईचं 'असं' फुटलं भांडं 

Social Viral : ३० वर्षांपूर्वी तिच्या आईनं जी गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती त्याचा एका डीएनए टेस्टनं खुलासा झाला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:54 AM2021-10-15T11:54:02+5:302021-10-15T12:02:51+5:30

Social Viral : ३० वर्षांपूर्वी तिच्या आईनं जी गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती त्याचा एका डीएनए टेस्टनं खुलासा झाला. 

Social Viral : Dna test revealed mother 30 years secret that daughters father is not her biological father | Social Viral : धक्कादायक! ३० वर्षांपासून ज्यांना स्वत:चे वडील समजत होती ते खरे वडील नव्हतेच; आईचं 'असं' फुटलं भांडं 

Social Viral : धक्कादायक! ३० वर्षांपासून ज्यांना स्वत:चे वडील समजत होती ते खरे वडील नव्हतेच; आईचं 'असं' फुटलं भांडं 

लहानपणापासूनच प्रत्येकासाठी आई-वडील हे दोन व्यक्ती खूप महत्वाचे असतात. पण जेव्हा आई वडिलांबाबत काही गोष्टी मुलांपासून लपवल्या जातात आणि नंतर कोणत्या ना कोणत्या मार्गानं त्याच्या खुलासा होतो तेव्हा त्यांना मानसिक धक्का बसण्याची शक्यता असते.  ३० वर्षांपासून एक मुलगी ज्यांना तिचे खरे वडील समजत होती, ३० वर्षानंतर तिला कळलं की ती ज्या माणसाला आपले वडील समजत आहे ते तिचे खरे वडील नाहीत.

डीएनए टेस्ट केल्यानंतर हा खुलासा झाला आहे. डीएनए टेस्टनंतर त्या मुलीनं सांगितलं की, ती तिच्या उपस्थित वडिलांनाच तिचे खरे वडील समजेल कारण त्यांनीच तिला लहानाचं मोठं केलं होतं. तिच्या जैविक वडिलांबाबत माहिती मिळवण्याची जराही इच्छा नाही असं देखील तिनं सांगितलं. 

द सन युके च्या रिपोर्टनुसार जैविक कुटुंबाबद्दल माहिती मिळवून या मुलीनं आपल्या आईला सरप्राईज देण्याचा विचार होता. म्हणून तिनं आपल्या वडिलांसह डिएनए टेस्ट केली. या चाचणीचे रिपोर्ट असे काही येतील असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ३० वर्षांपूर्वी तिच्या आईनं जी गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती त्याचा एका डीएनए टेस्टनं खुलासा झाला. 

टिकटॉक युजर असलेल्या या  मुलीनं  @sincerelysapphic  याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या मुलीचा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओत तिनं सांगितलं की, एकाचवेळी तिला आणि तिच्या वडीलांना कळलं की, ते तिचे जैविक वडील नाहीत. ही गोष्ट तिच्या आईनं ३० वर्ष लपवून ठेवली. 

या मुलीनं सांगितलं की, ''माझी आई जिला दत्तक घेण्यात आलं होतं तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करत होते. त्यासाठी मी डीएनए टेस्ट करण्याचा विचार केला. त्यानंतर मी वडीलांच्या जैविक कुटुंबाचा शोध घेण्याचाही विचार केला. पण खरं समोर आलं तेव्हा माझ्या पाया खालची जमिनंच सरकली.'' 

दरम्यान  जेव्हा या मुलीला तिच्या खऱ्या वडीलांबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा तिनं ज्यांच्यासोबत लहानाची मोठी झाली त्यांच्याच सोबत आयुष्यभर राहणार असल्याचं सांगितलं. मला माझ्या जैविक वडीलांबद्दल शोध घेण्यात काहीच रस नसल्याचंही तिनं या व्हिडीओत सांगितलं आहे. 

Web Title: Social Viral : Dna test revealed mother 30 years secret that daughters father is not her biological father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.