Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > किचन-कपाटांत छोट्या झुरळांचा सुळसुळाट? १० रूपयांच्या तुरटीचा १ उपाय, झुरळं गायब

किचन-कपाटांत छोट्या झुरळांचा सुळसुळाट? १० रूपयांच्या तुरटीचा १ उपाय, झुरळं गायब

Secret Trick To Get Rid Of Cockroaches : हे द्रावण तयार करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती सुगंधित वस्तूंची गरज लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:53 IST2025-10-08T13:27:04+5:302025-10-08T14:53:07+5:30

Secret Trick To Get Rid Of Cockroaches : हे द्रावण तयार करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती सुगंधित वस्तूंची गरज लागेल.

Secret Trick To Get Rid Of Cockroaches naturally in overnight from house Using Alum | किचन-कपाटांत छोट्या झुरळांचा सुळसुळाट? १० रूपयांच्या तुरटीचा १ उपाय, झुरळं गायब

किचन-कपाटांत छोट्या झुरळांचा सुळसुळाट? १० रूपयांच्या तुरटीचा १ उपाय, झुरळं गायब

स्वंयपाकघरात किंवा कपाटात खूपच झुरळं झाली असतील तर तुम्ही काही खास उपाय करून झुरळांना दूर पळवू शकता. झुरळांना दूर पळवण्यासाठी तुम्हाला महागड्या केमिकल्सयुक्त रसायनांची आवश्यकता नाही. सोपे घरगुती उपाय करून तुम्ही झुरळांना कायमचं घराबाहेर पळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त १० रूपयांचा तुरटीचा खडा लागेल आणि किचनमधील काही साहित्याचा वापर करावा लागेल. (Secret Trick To Get Rid Of Cockroaches naturally in overnight from house Using Alum)

माधुरी शिंदे यांच्या म्हणण्यांनुसार झुरळांना घरातून पळवून लावणं सोपं आहे. दिवाळीच्या साफ-सफाईच्यावेळी पांढऱ्या तुरटीचा एक उपाय करून तुम्ही झुरळं आणि झुरळांच्या पिल्लांना कायमचं घराबाहेर ठेवू शकता. झुरळांना घराबाहेर कसं करायचं ते समजून घेऊ. (Secret Trick To Get Rid Of Cockroaches)

हे द्रावण तयार करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती सुगंधित वस्तूंची गरज लागेल. एका भांड्यात एक ग्लास पाणी, अर्धा लिंबू आणि ३ ते ४ तमालपत्र तोडून घाला. लिंबातील एसिडिक गुण तमालपत्राचा तिखट वास दूर करण्यास मदत करतील.

पांढरा तुकडा तुमचं काम सोपं करेल

तुम्हाला एक भांडं गॅसवर ठेवायचं आहे. तयार मिश्रण गरम होण्यासाठी त्यात तुरटीचा पांढरा तुकडा घालून ठेवा. हा तुरटीचा तुकडा तुम्हाला १० रूपयांत मिळेल. तुरटीमुळे फक्त पाणी शुद्ध होणार नाही तर याचा वास झुरळांना दूर करण्यास मदत करेल. पाण्याला एक किंवा दोन उकळ येईपर्यंत गरम करा.

उकळल्यानंतर हे मिश्रण पूर्ण थंड होण्याआधीच गाळून त्यात बेकिंग सोडा घाला. कारण हे मिश्रण हलकं गरम असेल आणि त्यात बेकिंग सोडा घातला तर खूप फेस येईल. यानंतर त्यात मीठ आणि कापूरची पावडर घाला. मीठ आणि कापूरची दोघांमध्ये डिहायड्रेटिंग गुणधर्म असतात जे झुरळांसाठी घातक ठरतात. या द्रावणात एक झाकण डेटॉल मिसळा.

न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू

हे मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ नका. हलकं गरम असताना याचा वापर करा. जेणेकरून कापूर आणि इतर तत्वांचा प्रभाव राहील. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून शिंपडा. रात्री झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तसंच दीर्घकाळ स्टोअर करून ठेवू शकता.

Web Title : फिटकरी के सरल घोल से तिलचट्टे मिटाएँ: एक प्राकृतिक उपाय

Web Summary : फिटकरी, नींबू और तेज पत्ते का उपयोग करके तिलचट्टे को स्वाभाविक रूप से खत्म करें। उबालें, बेकिंग सोडा, नमक, कपूर और डेटॉल मिलाएं। प्रभावी, लंबे समय तक कीट नियंत्रण के लिए रात में तिलचट्टा-प्रवण क्षेत्रों में गर्म घोल का छिड़काव करें।

Web Title : Eradicate Cockroaches with a Simple Alum Solution: A Natural Remedy

Web Summary : Eliminate cockroaches naturally using alum, lemon, and bay leaves. Boil, add baking soda, salt, camphor, and Dettol. Spray the warm solution in cockroach-prone areas at night for effective, long-lasting pest control.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.