भारतीय पुरुषाशी लग्न केलेल्या एका रशियन महिलेचं रील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये महिलेने पतीशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याची तीन खास कारणं शेअर केली आहेत. केसेनिया चावरा नावाच्या या महिलेने इ्न्स्टाग्रामवर स्वतःची ओळख "भारतीय पुरुषाशी लग्न केलेली रशियन गर्ल" अशी करून दिली आहे. तिच्या या व्हि़डीओला २.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
केसेनियाने तिच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये पतीबद्दलचं प्रेम अत्यंत गोड पद्धतीने दाखवलं, त्याचसोबत त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. “मी भारतीय पुरुषाशी लग्न का केलं याची ३ कारणं शेअर करते. तो नेहमीच माझ्यासाठी चविष्ट जेवण बनवतो, तो माझ्या बाळाला खूप सुंदर तयार करतो. तो नेहमीच माझी काळजी घेतो आणि माझ्यावर खूप प्रेम करतो” असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
रीलच्या कॅप्शनमध्ये “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू जगातील सर्वात बेस्ट पती आहेस” असं म्हटलं आहे. या रीलने सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. भारतीय पुरुषाचं रशियन महिलेने केलेलं भरभरून कौतुक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लोक यावर आपल्या प्रतिक्रिय देत आहेत. “आपण सर्वजण अशा प्रकारच्या निखळ आणि काळजी घेणाऱ्या प्रेमासाठी पात्र आहोत” असं एका युजरने म्हटलं आहे.
"जेवण आणि प्रेम हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन" असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. "फूड कमेंट खूपच क्यूट आहे", "तुम्ही दोघेही असेच नेहमी आनंदाने चमकत राहा", "तिच्या हसण्यामध्ये ती किती खूश आहे हे समजतं", "तो फक्त तिच्यासाठी नवरा नाही तर तिचं आयुष्य आहे", "वेगळ्या संस्कृतीतील लग्न हे प्रेमामुळे फार सुंदर वाटतं" अशा प्रतिक्रिया लोक व्हिडीओवर देत आहेत.