Lokmat Sakhi >Social Viral > चांगली घासली - धुतल्यावरही बॉटलचा वेगळा वास येतो? करा 'हा' उपाय, नवीन बॉटलचा खर्चही वाचेल

चांगली घासली - धुतल्यावरही बॉटलचा वेगळा वास येतो? करा 'हा' उपाय, नवीन बॉटलचा खर्चही वाचेल

Right Way To Clean Water Bottle : अनेकदा बॉटल आतून-बाहेरून चांगल्या घासल्या तरी हा वास काही जात नाही. आपल्या बॉटलसोबतही असं होत असेल आज आपण यावर एक रामबाण उपाय पाहणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:42 IST2025-08-28T10:41:38+5:302025-08-28T10:42:50+5:30

Right Way To Clean Water Bottle : अनेकदा बॉटल आतून-बाहेरून चांगल्या घासल्या तरी हा वास काही जात नाही. आपल्या बॉटलसोबतही असं होत असेल आज आपण यावर एक रामबाण उपाय पाहणार आहोत. 

Right and easy cleaning way to get rid of water bottle smell | चांगली घासली - धुतल्यावरही बॉटलचा वेगळा वास येतो? करा 'हा' उपाय, नवीन बॉटलचा खर्चही वाचेल

चांगली घासली - धुतल्यावरही बॉटलचा वेगळा वास येतो? करा 'हा' उपाय, नवीन बॉटलचा खर्चही वाचेल

Kitchen Tips: ऑफिसला जायचं असेल किंवा बाहेर कुठेही जायचं असेल तर भरपूर हेल्थ कॉन्शिअस लोक आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवतात. जेणेकरून तहान लागल्यावर पाणी पिता यावं. स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे अलिकडे सोबत पाण्याची बॉटल कॅरी करणं बरंच वाढलं आहे. बाजारात अनेक फॅन्सी बॉटल्सही आल्यात. कुणी प्लास्टिकच्या बॉटल वापरतात तर कुणी स्टील, तर कुणी तांब्याच्या बॉटल वापरतात. पण या बॉटल्सचा काही दिवसांनी एक वेगळा वास येऊ लागतो. अनेकदा बॉटल आतून-बाहेरून चांगल्या घासल्या तरी हा वास काही जात नाही. आपल्या बॉटलसोबतही असं होत असेल आज आपण यावर एक रामबाण उपाय (Right Way To Clean Water Bottle) पाहणार आहोत. 

सामान्यपणे पाण्याच्या बॉटलचा वास ओलाव्यामुळे आणि ती दिवसभर झाकण लावून असल्यानं येतो. अनेकदा बॉटल पूर्णपणे सुकवली जात नाही. याच गोष्टी वास येण्याला कारणीभूत ठरतात.

हा उपाय करेल मदत

पाण्याच्या बॉटलचा वास दूर करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतील. जसे की, 1 चमचा सैंधव मीठ, मुठभर तांदूळ, 1 लिंबू आणि थोडं गरम पाणी. 

आता सगळ्यात आधी बॉटलमध्ये 1 चमचा मीठ घाला. त्यानंतर मुठभर तांदूळ टाका आणि वरून अर्धा लिंबू पिळा. नंतर त्यात गरम पाणी टाकून बॉटल चांगली हलवा. 5 मिनिटानंतर पाणी बाहेर फेका व साध्या पाण्यानं पुन्हा बॉटल चांगली धुवा. हा उपाय केल्यावर आपल्या लक्षात येईल की, बॉटलचा वेगळा दूर झाला आहे.

सैंधव मीठ एका नॅचरल क्लीनरचं काम करतं. यानं ओलावा शोषला जातो आणि बॅक्टेरियाही नष्ट होतात. तर तांदळानं स्क्रबरचं काम होतं. यानं बॉटलची आतून सफाई होते. तर लिंबानं बॉटलचा वास निघून जातो. 

अशात एकदा हा उपाय करून आपण बॉटलचा येणारा वास दूर करू शकता. सोबतच दर काही दिवसांनी नवीन बॉटल घेण्याचा आपला खर्चही वाचेल.

Web Title: Right and easy cleaning way to get rid of water bottle smell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.