Lokmat Sakhi >Social Viral > गेली चपला खरेदीला, करते आहे ऑफिसची ऑनलाईन मीटिंग! पाहा ' असं ' कामाचं प्रेशर तुमच्यावर आहे का?

गेली चपला खरेदीला, करते आहे ऑफिसची ऑनलाईन मीटिंग! पाहा ' असं ' कामाचं प्रेशर तुमच्यावर आहे का?

Peak Bengaluru moment: Woman goes shoe shopping while attending team meeting, Internet says ‘side effects of WFH’ : मिटिंगमध्ये सहभागी होत, महिला करते चप्पालांची शॉपिंग; मल्टी टास्किंग म्हणावं की आणखीन काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 12:38 PM2024-05-24T12:38:29+5:302024-05-24T14:39:59+5:30

Peak Bengaluru moment: Woman goes shoe shopping while attending team meeting, Internet says ‘side effects of WFH’ : मिटिंगमध्ये सहभागी होत, महिला करते चप्पालांची शॉपिंग; मल्टी टास्किंग म्हणावं की आणखीन काय?

Peak Bengaluru moment: Woman goes shoe shopping while attending team meeting, Internet says ‘side effects of WFH’ | गेली चपला खरेदीला, करते आहे ऑफिसची ऑनलाईन मीटिंग! पाहा ' असं ' कामाचं प्रेशर तुमच्यावर आहे का?

गेली चपला खरेदीला, करते आहे ऑफिसची ऑनलाईन मीटिंग! पाहा ' असं ' कामाचं प्रेशर तुमच्यावर आहे का?

वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरु झाल्यापासून, एकाच जागेवर बसून काम करण्याची सवय बऱ्यापैकी लोकांची सुटली नाही (Peak Bengaluru moment). आपण ज्या ठिकाणी कम्फर्टेबल आहोत, त्या ठिकाणी बसून आपण काम करतो. शिवाय संगणकावर काम न करता, लॅपटॉपवर काम करणं अधिक सोपं आहे (Work from Home). आपण बेडरूममध्ये किंवा हॉलरूममध्ये बसतो. तर काही लोक कॅफेमध्ये जाऊन मिटिंगमध्ये सहभागी होतात (Social Viral). पण आतापर्यंत तुम्ही कोणाला चप्पलांच्या दुकानात जाऊन मिटिंगमध्ये सहभागी झाल्याचं पाहिलं आहे का? ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? 

बंगळुरूमधील एका महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ती महिला चक्क शूज खरेदी करताना, ऑफिस मिटिंगमध्ये सहभागी झाल्याचे दिसते आहे. ऑफिसवर इतकं प्रेम खरंच असू शकतं का? असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत(Peak Bengaluru moment: Woman goes shoe shopping while attending team meeting, Internet says ‘side effects of WFH’).

मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

महिलेला काम, चप्पलांच्या दुकानातही सोडवलं नाही..

कार्तिक भास्कर नावाच्या एका एक्स वापरकर्त्याची पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला चप्पलांच्या दुकानात शॉपिंग तर करत आहेच, सोबत लॅपटॉपवर मिटिंगमध्येही सहभागी झाली आहे. या फोटोलो लोक ‘पीक बेंगलुरु मोमेंट’ म्हणत आहे. पण खरंच हा पीक बेंगलुरु मोमेंट आहे का? याला मल्टी टास्किंग म्हणावं की आणखीन काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काहींनी केलं ट्रोल तर काही म्हणाले..

फोटोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काही लोकांना फोटो मजेशीर वाटला, तर, काहींनी बदलत चाललेल्या वर्क क्लचरबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतलुन न राखता येण्याचे नकारात्मक परिणाम अधोरेखित केले आहे.

चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ

एकाने कमेण्ट करत म्हटलं की, 'ही अभिमानाची गोष्ट आहे की नाही माहित नाही. महिलेला वर्क-लाइफ बॅलन्स करायला जमलं पाहिजे.', तर दुसऱ्याने 'आपण माणसं आहोत, मशीन नाही. जास्त तास काम करण्याची गरजच नाही.', तर आणखीन एका युझरने 'हे काम फोनवर करता आले असते. दोन्ही गोष्टी मिटिंग आणि बूट खरेदी देखील.' शिवाय एकाने, 'हा फोटो वर्क प्लेस आणि मॅनजेर आणि फाउंडर्स किती टॉक्सिक असू शकतात हे दर्शवते.'

Web Title: Peak Bengaluru moment: Woman goes shoe shopping while attending team meeting, Internet says ‘side effects of WFH’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.