lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > "ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली 

"ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली 

Navya Naveli Nanda Praises Aaradhya Bachchan: नव्या नवेली नंदा हिने तिच्या मामेबहिणीबद्दल म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिच्याबाबत जे विधान केलं आहे, ते सध्या खूपच जास्त चर्चेत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 02:52 PM2024-04-19T14:52:36+5:302024-04-19T14:54:33+5:30

Navya Naveli Nanda Praises Aaradhya Bachchan: नव्या नवेली नंदा हिने तिच्या मामेबहिणीबद्दल म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिच्याबाबत जे विधान केलं आहे, ते सध्या खूपच जास्त चर्चेत आहे.

Navya Naveli Nanda praises aishwarya rai and abhishek bachchans daughter aaradhya bachchan | "ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली 

"ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली 

Highlightsनव्याचा एका व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये बोलताना ती म्हणाली होती की आराध्या ही तिच्या वयाच्या मानाने...

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), जया बच्चन यांच्या नात्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या चर्चा समोर येत असतात. त्यात बऱ्याचदा श्वेता बच्चन हिच्या नावाचाही उल्लेख केला जातो. सध्या बच्चन कुटूंबात जे काही तथाकथित वादविवाद आहेत, त्यामुळे अगदी आराध्यापासून ते अमिताभ यांच्यापर्यंत सगळंच बच्चन कुटूंब चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा श्वेता बच्चन हिची लेक म्हणजेच नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हिच्याबाबत जे काही बोललं आहे, तो पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे. 

 

नव्यानवेली मागच्या काही दिवसांपासून पॉडकास्ट करत असते आणि त्यामध्ये तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करते. 

मुलांना दूध आवडत नसल्यास 'ही' फळं द्या, भरपूर कॅल्शियम मिळून दात- हाडं होतील बळकट

नव्याचा एका व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये बोलताना ती म्हणाली होती की आराध्या ही तिच्या वयाच्या मानाने खूपच जास्त समजूतदार, हुशार आहे. वेगवेगळ्या विषयांबाबत तिला खूप चांगली आहे. मी तिच्या वयाची होते, तेव्हा मला तिच्या तुलनेत खूपच कमी गोष्टींची माहिती होती आणि मी नक्कीच तिच्याएवढी शार्प नव्हते.

 

पुढे बोलताना नव्या म्हणाली की त्यामुळेच एक मोठी बहिणी म्हणून मी तिला काही सांगण्यापेक्षा किंवा तिला कोणता उपदेश देण्यापेक्षा मीच तिच्याकडून काही गोष्टी निश्चितच शिकू शकते.

स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा...

मला असं वाटतं की जी समज ती या वयात दाखवते आहे, त्यावरून ती आयुष्यात खूप पुढे जाईल. नव्याला आराध्याबद्दल असा विश्वास आहे की जग बदलून दाखविण्याची धमक असणाऱ्या ज्या तरुण स्त्रिया तिच्या कुटूंबात आहेत, त्यापैकीच एक आराध्याही असेल.. आत्येबहिणीने तर आराध्याचे भरभरून कौतूक केले आहे. आता ती तिच्या कौतूकाला आणि विश्वासाला किती पात्र ठरते, ते येणारा काळात दिसेलच.

 

Web Title: Navya Naveli Nanda praises aishwarya rai and abhishek bachchans daughter aaradhya bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.