Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात डास छळतात, फक्त १ रोप लावा-घरातले सगळे डास होतील गायब! उदबत्या-धूपचीही गरज नाही

पावसाळ्यात डास छळतात, फक्त १ रोप लावा-घरातले सगळे डास होतील गायब! उदबत्या-धूपचीही गरज नाही

Mosquito Repellent Plant: पावसाळ्यात घरात डास होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं (how to get rid of mosquitoes?). म्हणूनच डासांना पळवून लावणारा हा सोपा उपाय पाहून घ्या..(how to keep mosquitos away from house?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:51 IST2025-06-12T15:18:21+5:302025-06-13T18:51:03+5:30

Mosquito Repellent Plant: पावसाळ्यात घरात डास होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं (how to get rid of mosquitoes?). म्हणूनच डासांना पळवून लावणारा हा सोपा उपाय पाहून घ्या..(how to keep mosquitos away from house?)

mosquito repellent plant, benefits of tapori plant to keep mosquitos away, how to get rid of mosquitoes, how to keep mosquitos away from house  | पावसाळ्यात डास छळतात, फक्त १ रोप लावा-घरातले सगळे डास होतील गायब! उदबत्या-धूपचीही गरज नाही

पावसाळ्यात डास छळतात, फक्त १ रोप लावा-घरातले सगळे डास होतील गायब! उदबत्या-धूपचीही गरज नाही

Highlightsडासांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळे लिक्विड, उदबत्ती मिळतात. अंगाला लावण्याचे क्रिमही आहेत. पण या सगळ्यांमध्येच भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात.

पावसाळा आता सुरू झालेला आहे. त्यामुळे सगळीकडे डासांचं प्रमाणही वाढतं. कारण पावसाळ्यात पावसाच्या पाण्याची डबकी ठिकठिकाणी साचून राहतात. आपल्या अंगणात, बाल्कनीत, गच्चीवरही अनेक ठिकाणी पाणी साचून राहतं. साचलेल्या पाण्यामध्ये डासांची निर्मिती होत राहते. त्यामुळे मग या दिवसांत डासांचे प्रमाण सगळीकडेच खूप जास्त वाढलेले दिसते. डासांची संख्या वाढली की आपोआपच डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही वाढते (how to get rid of mosquitoes?). हे आजार आपल्या कुटूंबापर्यंत पोहोचू द्यायचे नसतील तर सगळ्यात आधी घरातून डासांना दूर हकलायला हवे (how to keep mosquitos away from house?). त्यासाठी हा उपाय आपल्याला नक्कीच खूप फायदेशीर ठरू शकतो.(mosquito repellent plant)

 

डासांना पळवून लावण्यासाठी कोणती रोपे लावावी?

डासांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळे लिक्विड, उदबत्ती मिळतात. अंगाला लावण्याचे क्रिमही आहेत. पण या सगळ्यांमध्येच भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात. हे केमिकल्स सगळ्यांनाच सहन होतील असं नाही. काही लोकांना त्याची ॲलर्जी असल्याने खूप त्रासही होतो.

पाण्याची बाटली रोज नुसती विसळता आणि भरून घेता? आजारपण वाढेल- 'या' पद्धतीने करा स्वच्छता 

त्यामुळे आता हा एक नैसर्गिक उपाय करून घरातले डास तुम्ही पळवून लावू शकता. हा उपाय म्हणजे तुमच्या घराजवळ 'टपोरी' हे रोप लावणे. 'गोल्डन बॉटल ब्रश', 'टेबल कामिनी' या नावानेही हे रोप ओळखलं जातं. हे रोप अंगणात किंवा घराजवळच्या मोकळ्या जागेत लावू शकता. जर तुम्हाला ते बाल्कनीमध्ये लावायचं असेल तर त्यासाठी मोठ्या आकाराची कुंडी घ्या.

 

हे रोप तुम्हाला तुमच्या शहरातल्या नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरही मिळू शकेल. या झाडाची खूप देखभाल करण्याची गरज नसते.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याची भीती वाटते? 'हे' पाणी वापरा- केस गळणं थांबेल

हे रोप तुम्ही इनडोअर किंवा आऊटडोअर अशा दोन्ही पद्धतीने वापरू शकता. या रोपाला जी फुलं येतात त्यांना खूप मंद सुगंध असतो. या सुगंधामुळेच डास या रोपापासून दूर राहतात. नेहमीच हिरवंगार राहणारं हे रोप तुमचं डासांपासून तर संरक्षण करतेच पण तुमच्या घराची, अंगणाची, बागेची शोभाही वाढवते. 

 

Web Title: mosquito repellent plant, benefits of tapori plant to keep mosquitos away, how to get rid of mosquitoes, how to keep mosquitos away from house 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.