Lokmat Sakhi >Social Viral > वर्गातल्या भन्नाट मस्तीत मुलांनी केला रॅम्पवॉक, पाहा मन आनंदी करणारा एक सुंदर व्हिडिओ...

वर्गातल्या भन्नाट मस्तीत मुलांनी केला रॅम्पवॉक, पाहा मन आनंदी करणारा एक सुंदर व्हिडिओ...

Viral Video Teacher Organised Ramp Walk For Students Turning An Ordinary Day Into A Celebration : Teacher organises ramp walk for students in classroom. Adorable video goes viral : Meghalaya Teacher's Classroom Ramp Walk Activity Goes Viral, Wins Hearts Online : शिक्षिकेने वर्गातील मुलांसाठी चक्क एका हटके रॅम्प वॉकचे आयोजन केल्याचे दिसत आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2025 18:00 IST2025-07-05T17:43:04+5:302025-07-05T18:00:20+5:30

Viral Video Teacher Organised Ramp Walk For Students Turning An Ordinary Day Into A Celebration : Teacher organises ramp walk for students in classroom. Adorable video goes viral : Meghalaya Teacher's Classroom Ramp Walk Activity Goes Viral, Wins Hearts Online : शिक्षिकेने वर्गातील मुलांसाठी चक्क एका हटके रॅम्प वॉकचे आयोजन केल्याचे दिसत आहे...

Meghalaya Teacher's Classroom Ramp Walk Activity Goes Viral, Wins Hearts Online Viral Video Teacher Organised Ramp Walk For Students Turning An Ordinary Day Into A Celebration | वर्गातल्या भन्नाट मस्तीत मुलांनी केला रॅम्पवॉक, पाहा मन आनंदी करणारा एक सुंदर व्हिडिओ...

वर्गातल्या भन्नाट मस्तीत मुलांनी केला रॅम्पवॉक, पाहा मन आनंदी करणारा एक सुंदर व्हिडिओ...

शाळा आणि शाळेतल्या आठवणींचा एक हळवा कोपरा नेहमीच सगळ्यांच्याच मनात कायम असतो. आपण कितीही मोठे झालो तरीही शाळेला विसरणं अश्यकच आहे. शाळेत ( Meghalaya Teacher's Classroom Ramp Walk Activity Goes Viral, Wins Hearts Online) केलेला अभ्यास, खोडी, मस्ती किंवा काही आठवणी या आपल्या मनावर इतक्या स्पष्ट कोरल्या जातात की, विसरणं थोडं अवघडच होत. शाळा म्हणजे फक्त शिक्षणाचे ठिकाण नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या गोड आठवणींचा खजिनाच असतो. खरंतर, शाळेत मिळालेल्या या अनुभवातूनच आपण माणूस म्हणून घडत असतो(Viral Video Teacher Organised Ramp Walk For Students Turning An Ordinary Day Into A Celebration).

शाळेतील दिवस संपले तरी त्या सुंदर आठवणींमुळे मन नेहमीच त्या निरागस काळात हरवून जातं. शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच, इतरही अनेक गोष्टी शिकवल्या जातात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल ( Teacher organises ramp walk for students in classroom. Adorable video goes viral) होत आहे, ज्यामध्ये शिक्षकाने वर्गातील मुलांसाठी चक्क एका हटके रॅम्प वॉकचे आयोजन केल्याचे दिसत आहे. आपल्या शिक्षकाने मुलांसाठी खास आयोजित केलेल्या रॅम्प वॉकमध्ये मुलं मोठ्या आनंदाने आणि हौसेने सहभागी होताना दिसत आहेत. 

शिक्षकाने दिले विद्यार्थ्यांना सरप्राईज... 

सध्या इंटरनेटवर एका शाळकरी मुलांचा गणवेशात रॅम्प वॉक करतानाच व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना आहे मेघालयमधील एका शाळेतील. मेघालयमधील गरबाधा येथील सेंट डॉमिनिक सॅविओ हायर सेकंडरी स्कूलमधील शिक्षक तेंगस्मार्ट एम. संगमा यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अचानकपणे एका रॅम्प वॉकचे आयोजन करून त्यांचा नेहमीचा शाळेचा दिवस खास केल्याचे दिसत आहे. या मुलांच्या मनात त्यांच्या शाळेतील विविध आठवणींपैकी ही खास आठवण कायमच लक्षात राहणारी ठरणार आहे. 

पावसाळ्यात सर्दी-खोकला सतत होतो? लवंग आणि वेलचीचा ‘हा’ उपाय-पावसाळ्यात आजारपण टळेल...

शिक्षकाने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या रॅम्प वॉकमध्ये कोणाही सेलिब्रिटी किंवा कोणी मॉडेल नाही. तसेच कोणी कोणतेही फॅन्सी कपडे सुद्धा घातले नाहीत. तर वर्गातील काही विद्यार्थी चक्क गणवेशातच हा रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. @the_casual_indian या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विद्यार्थी दोन्ही बाकामध्ये असणाऱ्या जागेत एकेक करून रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. त्यादरम्यान रॅम्प वॉक करताना वर्गातील इतर वर्गमित्र त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवत आहेत, तर काही जण डान्स करून त्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत.

बाथरुमच्या पाईपमध्ये केसांचा गुंता अडकून चोकअप होते? ३ ट्रिक्स, पाणी तुंबणार नाही...

गॅस शेगडीवरचे डाग काढा झटपट, घ्या फक्त १ चमचा मीठ-१ चमचा पीठ! पाहा भन्नाट ट्रिक...

आपल्या शिक्षकाने आपल्यासाठी दिलेलं खास सरप्राईज या मुलांना भन्नाट आवडल्याचे त्यांचे चेहरेच हे सांगत आहेत. वर्गातील सगळेच विद्यार्थी या रॅम्प वॉकचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. कुणी आपल्या मित्र - मैत्रिणींसोबत हातात हात घालून रॅम्प वॉक करत आहे, तर कुणी कमरेवर हात ठेवून मॉडेल प्रमाणे चालत आहे. कुणी केस उडवत तर कुणी हसत - खिदळत मजा घेत रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. या चिमुकल्यांचा हा सुंदर, निरागस, निखळ हास्य असणारा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील तुमच्या बालपणाची व शाळेची आठवण नक्कीच येईल. या मुलांचा हा रॅम्प वॉक जरी एक खेळ किंवा मज्जा मस्तीचा प्रसंग असला तरी त्यांच्या मनात या गोड दिवसाची कायमच आठवण राहील.


Web Title: Meghalaya Teacher's Classroom Ramp Walk Activity Goes Viral, Wins Hearts Online Viral Video Teacher Organised Ramp Walk For Students Turning An Ordinary Day Into A Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.