Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारीक होण्याचं वेड, Youtube वर पाहून खाल्लं केमिकल; १९ वर्षीय तरुणीचा तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:31 IST

यूट्यूबवर पाहिलेला उपाय एका तरुणीसाठी जीवघेणा ठरला.

वजन कमी व्हावं, आपण बारीक दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. लठ्ठपणामुळे केवळ आत्मविश्वास कमी होतो असं नाही, तर अनेक आजारांना आमंत्रणही मिळतं. अशा परिस्थितीत अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'वजन कसं कमी करायचं?' यावर उपाय शोधतात. मात्र अनेकदा असे शॉर्टकट जीवावर बेतू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूतील मदुराई येथे घडली आहे, 

यूट्यूबवर पाहिलेला उपाय एका तरुणीसाठी जीवघेणा ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मदुराईच्या मीनांबलपुरम येथील १९ वर्षीय कलैयारसी तिच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त होती. तिने यूट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, 'बोरेक्स' (सोडियम बोरेट) खाल्ल्याने वजन झपाट्यानं कमी होतं. या व्हिडिओला बळी पडून कलैयारसीने १६ जानेवारी रोजी एका दुकानातून ते केमिकल विकत घेतलं आणि १७ जानेवारीला सकाळी त्याचं सेवन केलं.

कुटुंबीयांसमोरच तरुणीचा तडफडून मृत्यू

केमिकल खाल्ल्यानंतर काही वेळातच तिला खूप उलट्या आणि जुलाब सुरू झाले. नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं, तिथे प्राथमिक उपचार करून तिला घरी सोडण्यात आलं. मात्र संध्याकाळपर्यंत तिची प्रकृती अधिकच खालावली. प्रचंड अशक्तपणा आणि सततच्या उलट्यांमुळे तिला रात्री ११ वाजता सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कलैयारसीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुटुंबीयांसमोरच तरुणीचा तडफडून मृत्यू झाला.

बोरेक्स किती घातक? 

तज्ज्ञांच्या मते, बोरेक्स हे प्रामुख्याने घरातील साफसफाई, कपडे धुण्याचं डिटर्जंट आणि कीटकनाशक म्हणून वापरलं जातं. हे मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आहे. याचं सेवन केल्याने किडनी निकामी होऊ शकते. शरीराच्या अंतर्गत अवयवांना गंभीर इजा होऊन 'केमिकल पॉयझनिंग' होतं. अनेकदा यामुळे काही तासांतच मृत्यू ओढवतो. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये याचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teen dies after consuming chemical seen on YouTube for weight loss.

Web Summary : A 19-year-old in Madurai died after consuming borax, a chemical she saw on YouTube as a weight loss remedy. She suffered severe vomiting and diarrhea, leading to organ failure. Experts warn borax is highly toxic and banned in many countries.
टॅग्स :सोशल व्हायरलयु ट्यूबवेट लॉस टिप्समृत्यूआरोग्य