Join us

उन्हाळ्यात माठातलं पाणी लवकर गार होण्यासाठी १ खास ट्रिक; फ्रिजसारखं गारेगार राहील पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:35 IST

Kitchen Tips Tricks To Keep Water Cool In Earthen Pot : तुम्हाला माठातलं पाणी प्यायचं असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून पाणी थंड ठेवू शकता. 

उन्हाळ्याच्या दिवसांत नेहमीच थंड पाणी पिण्याची इच्छा होते. (Summer Health Tips) तब्येतीच्या समस्यांमुळे बरेच लोक फ्रिजचं पाणी टाळतात कारण यामुळे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. (Kitchen Tips Tricks) अशा स्थितीत तुम्ही माठातलं पाणी पिऊ शकता. पण माठातलं पाणी गरम असेल तर ते सुद्धा पिण्याची इच्छा होत नाही. माठातलं पाणी फ्रिजच्या पाण्यासारखं ठंड करण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. माठातलं पाणी प्यायल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आरामही मिळतो. (Kitchen Tips Tricks To Keep Water Cool In Earthen Pot Matka This Summer)

आजारांपासून दूर राहण्यासाठी हे पाणी प्यायला सुरूवात  करा. कारण मातीत अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे आजारांपासून लढण्यास मदत होते. इतकंच नाही तर यातून मिळणारे मिनरल्स शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त तुम्हाला माठातलं पाणी प्यायचं असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून पाणी थंड ठेवू शकता. 

या सोप्या ट्रिक्स वापरा (How To Keep Water Cool in Matka)

माठातलं पाणी थंड राहण्यासाठी सगळ्यात आधी रेती घ्या. रेती नसेल तर तुम्ही मातीसुद्धा घेऊ शकता. नंतर रेती ओली करून एक प्लेट किंवा वाटी टेवा. ज्यावर तुम्ही मातीचा माठ ठेवणार आहात.  त्यानंतर माठ स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर माठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.  त्यानंतर रात्रभरासाठी माठ तसाच ठेवून द्या. (ऊन्हामुळे मनी प्लांट सुकतोय-पानं पिवळी झाली? 5 टिप्स; बहरेल मनी प्लांटची वेल-हिरवेगार राहील)

माठ बाहेरून ओला करा. यातील पोर्समध्ये पाणी जाईल याची खात्री करा ज्यामुळे माठाच्या आतलं पाणी थंड राहील. दुसऱ्या दिवशी ते पाणी एका भांड्यात काढून घ्या नंतर स्वच्छ करून पुन्हा भरून घ्या. सकाळी ही क्रिया पुन्हा करा. पाणी भरल्यानंतर त्यात सैंधव मीठ घाला ७ ते ८ तास  तसंच ठेवून द्या. त्यानंतर नियमित दिवसातून एक ते दोनवेळा गरजेनुसार पाणी भरा. या उपायाने माठातलं पाणी थंड राहण्यास मदत होईल. (शुगरचा त्रास आहे, रोज रात्री भात खाल्ला तर डायबिटिस वाढतो का? पाहा डॉक्टरांचा सल्ला)

ओल्या कापडाने गुंडाळा

माठात स्वच्छ पिण्याचे पाणी  भरा त्यानंतर संपूर्ण माठाभोवती सुती कापड गुंडाळून ठेवा. ओल्या टॉवेलने गुंडाळून ठेवा. ज्यामुळे पाणी थंड राहण्यास मदत होईल. दिवसातून एक ते दोनवेळा सुती किंवा गोणीचे कापड माठाभोवती गुंडाळा. माठातलं पाणी १२ ते १८ तासांत २४ तासांनी थंड झालेलं असेल. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स