Join us

याला म्हणतात डोकं! चपातीचा डबा तुटला तर त्यातून बनवलं 'नवं स्टिलचं पातेलं', जुगाडू मम्मीची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:06 IST

Indian Mother Hack to Take Out Bowl Out If Roti Storing Box : एखादी वस्तू फेकून देणं हे आईच्या डिक्शनरीत मुळीच नसतं.

जर घरात कोणतीही वस्तू खराब झाली तर ती सरळ फेकून न देता त्याचा वापर इतर कामांसाठी केला जातो असं सर्व सामान्य कुटूंबांमध्ये अनेकदा होतं.(Indian Mom's Jugad) आपल्याला एखादी वस्तू जुनी झाली किंवा बिघडली म्हणून फेकावीशी वाटली तरी आई आपल्याला ते फेकू देत नाही. 'राहू दे नंतर कामात येईल, दुरूस्त करून अजून वर्षभर वापरता येईल...' असं आईचं म्हणणं असतं. जुन्या गोष्टी जपून ठेवणं आणि अनावश्यक खर्च टाळणं हा या मागचा उद्देश असतो. (Indian Mother Hack to Take Out Bowl Out If Roti Storing Casserole Box Jugad Video)

एखादी वस्तू फेकून देणं हे आईच्या डिक्शनरीत मुळीच नसतं. म्हणूनच आई कोणतीही वस्तू टाकून देण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या कामासाठी त्याचा पुन्हा वापर केला जातो. कापड फाटलं तर पायपुसणी केली जाते. भंगारात देण्यासारख्या वस्तूही कोणत्यातरी ड्रॉवरमध्ये सापडतात.

अलिकडेच आईचा एक देशी जुगाड व्हायरल होत आहे. ज्यात एक चपाती कॅसरॉल बॉक्स म्हणजेच चपाती ठेवण्याचा डब्बा खराब झाल्यानंतर फेकण्याऐवजी याचा वापर पातेल्याप्रमाणे केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी हात जोडले आहेत... 'आईच्या हातून काहीच वाया जात नाही.' अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे.

ही महिला चपातीच्या डब्याला गरम सुरी लावून चारही बाजूंनी कापून घेते. त्यानंतर ती वरचं कव्हर पू्र्णपणे काढून टाकते. त्यानंतर आतून एक पातेलं बाहेर येतं ज्यात चपात्या ठेवल्या जातात. सगळ्यात आधी ती सुरी गरम करून डब्बा उघडून घेते आणि त्यातून स्टीलचं पातेलं बाहेर काढते. या पातेल्याचा वापर चहा करण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी उपयोगी ठरेल.

व्हिडिओ पाहून लोक काय म्हणाले?

हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @Siimplymee1234 नावाच्या पेजनं शेअर केला आहे जो बराच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज आले आहेत. लोकांना हा हॅक खूप आवडला आहे.

१ नंबर! विद्यार्थ्यांसोबत मास्तरांनीही धरला ठेका; धमाकेदार डान्स- पाहा व्हायरल Video

अनेकांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकानं लिहलंय भारतीय आईसाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. दुसऱ्यानं लिहिलं भारतीय आई प्रत्येक फेकली जाणारी वस्तू वापरायोग्य बनवू शकते. 'जुगाड मम्मी ऑफ इंडीया' अशी कमेंट एकानं केली आहे.

टॅग्स :सोशल मीडियाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स