Lokmat Sakhi >Social Viral > न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये भारतीय तरुणीचा भन्नाट डान्स, पाहायला उडाली झुंबड-पाहा व्हिडिओ

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये भारतीय तरुणीचा भन्नाट डान्स, पाहायला उडाली झुंबड-पाहा व्हिडिओ

कोण आहे ही न्यूयॉर्क टाइम्सवर इतक्या गर्दीत डान्स करणारी तरुणी...व्हिडिओ एकदा पाहा तर खरं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 11:57 AM2022-04-15T11:57:30+5:302022-04-15T12:03:37+5:30

कोण आहे ही न्यूयॉर्क टाइम्सवर इतक्या गर्दीत डान्स करणारी तरुणी...व्हिडिओ एकदा पाहा तर खरं...

Indian girl dances in New York's Times Square | न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये भारतीय तरुणीचा भन्नाट डान्स, पाहायला उडाली झुंबड-पाहा व्हिडिओ

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये भारतीय तरुणीचा भन्नाट डान्स, पाहायला उडाली झुंबड-पाहा व्हिडिओ

Highlightsया व्हिडिओला २७ लाखांहून अधिक लाइक्स आले असून यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. डान्स करायला आवडणाऱ्यांना जागा, आजुबाजूचे लोक यांचे काहीही वाटत नाही....

ज्यांना डान्स करायला आवडतो ते कुठेही गाणे सुरू झाले की नाचायला सुरुवात करतात. मग आपण कुठे आहोत, आपण कसे नाचतोय, आपल्याकडे कोण पाहतोय याचा ते विचारही करत नाहीत. कारण ते आपल्या डान्समध्ये इतके दंग होऊन जातात की त्यांना कसलेच भान राहत नाही. मग तो गणपतीतील डान्स असो किंवा एखाद्या वरातीतील. हे लोक गाण्यावर असे काही थिरकतात की त्यांना पाहणारेही काही वेळ पाहतच राहतात. असाच एका डान्सचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक भारतीय तरुणी अमेरिकेतील न्यूयॉर्क टॉवर्स येथे डान्स करताना दिसत आहे. 

टाइम्स स्क्वेअर ही अतिशय प्रसिद्ध जागा असून याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तिचा डान्समधील जबरदस्त अंदाज पाहून आजुबाजूने जाणारे लोकही अतिशय कौतुकाने तिच्याकडे पाहत असल्याचे दिसते. हळूहळू तिचा डान्स पाहून तिच्या आजुबाजूला इतकी गर्दी झाली की तिचा डान्स पाहून जमलेले लोकही डान्स करायला लागले. ही तरुणी ‘नवाबजादे’ चित्रपटातील तेरे नाल नाचना या गाण्यावर थिरकत असल्याचे दिसते. सुरुवातीला तिच्या अशाप्रकारे डान्स करण्यावर लोक जोक करत असल्याचे दिसते. मात्र नंतर तेच लोक तिला सामील होत तिच्यासोबत डान्स करायला लागतात. 

या मुलीचे नाव पूजा जैसवाल असून ती पेशाने फॅशन ब्लॉगर असल्याचे सांगितले जात आहे. हॅपी पटाका या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २७ लाखांहून अधिक लाइक्स आले असून यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. अनेकांनी या मुलीच्या डान्सचे आणि तिच्या धाडसाचे कौतुक केले असून तुम्हीही तिने केलेला हा हटके डान्स एकदा पाहाच. २०१८ मध्ये नवाबजादे चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

Web Title: Indian girl dances in New York's Times Square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.