सेलिब्रिटी आणि विमानतळ या दोन गोष्टींचे अतूट नाते आहे. अनेक किस्से विमानतळावर घडत असतात. मिडिया आणि सेलिब्रिटींच्या गप्पा असतील किंवा विमानतळावर होणारी भांडणं काही तरी चालू असतंच. (Indian actress pays Rs 1 lakh fine in Australia, for carrying jasmine flowers )असाच एक किस्सा सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे तो म्हणजे मल्याळम अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलिया एअरपोर्टवर १.१४ लाखाचा दंड आकारला गेला आणि तिने तो मुकाट्याने भरला.
नक्की काय घडले ?
नव्या कायम साऊथ इंडियन लूक मध्ये दिसते. केसात छान गरजा माळायला तिला आवडतो हे तिच्या चाहत्यांना नक्कीच माहिती असेल. मात्र तोच गजरा तिला ऑस्ट्रेलियात मात्र लाखाला पडला. बायो-सिक्युरिटी नियमानुसार ऑस्ट्रेलिया या देशात जाताना प्रवासी जैविक काहीही घेऊन जाऊ शकत नाही. फळे, फुले, मसाले ज्यात कीड असू शकते असे काहीही इतर कोणत्याही देशातून ऑस्ट्रेलियाला नेणे कायद्याने अपराध आहे. कारण अशा वस्तू पर्यावरणीय धोका निर्माण करु शकतात. नव्याने माळलेला गरजाही त्या चौकटीत बसतो आणि त्यामुळे तिला दंड आकारला गेला. AUD 1,980 म्हणजेच सुमारे १.१४ लाख इतक्या रकमेचा दंड तिला भरावा लागला. ओणम साजरा करण्यासाठी माळलेला गजरा एवढा माहागात पडेल असा नव्याने विचारही केला नव्हता.
नव्याची यावर प्रतिक्रिया मात्र फारच सौम्य आणि योग्य होती. नव्याने तिची चूक मान्य केली. "मी आधी नियम व्यवस्थित वाचायला हवे होते. चूक नक्कीच माझी आहे आणि दंड भरणे माझे कर्तव्य आहे." असे नव्या म्हणाली. शिवाय यातून मला चांगली शिकवणूकच मिळाली आहे. या पुढे कुठेही जाताना मी काळजी घेईन आणि नियमांचे पालन करीन असे म्हणत नव्याने समजूतदारपणे दंड भरुन विषय संपवला. सोशल मिडियावर नव्याच्या प्रतिक्रियेचे कौतुक तर झालेच शिवाय लोकांनी जागरुक राहणे कसे गरजेचे आहे याबद्दलही अनेकांना मते मांडली. लहान चूक मोठा दंड भरायला लावू शकते. त्यामुळे प्रवास करताना ज्या ठिकाणी जाता तेथील नियम माहिती असणे फार गरजेचे आहे.