Lokmat Sakhi >Social Viral > दीप अमावस्या २०२५: कणकेचा दिवा करण्याची सोपी पद्धत- कमी तेलात दिवा जास्त वेळ उजळेल

दीप अमावस्या २०२५: कणकेचा दिवा करण्याची सोपी पद्धत- कमी तेलात दिवा जास्त वेळ उजळेल

How To Make Atta Diya For Deep Amavasya 2025: दीप अमावस्या येत्या गुरुवारी म्हणजेच २४ जुलैला आहे. यानिमित्ताने कणकेच्या दिव्याचे खूप महत्त्व आहे.(importance of atta diya on ashadhi Amavasya)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 13:34 IST2025-07-22T13:33:40+5:302025-07-22T13:34:47+5:30

How To Make Atta Diya For Deep Amavasya 2025: दीप अमावस्या येत्या गुरुवारी म्हणजेच २४ जुलैला आहे. यानिमित्ताने कणकेच्या दिव्याचे खूप महत्त्व आहे.(importance of atta diya on ashadhi Amavasya)

how to make atta diya for deep Amavasya 2025, importance of atta diya on ashadhi Amavasya, kankecha diva recipe in Marathi  | दीप अमावस्या २०२५: कणकेचा दिवा करण्याची सोपी पद्धत- कमी तेलात दिवा जास्त वेळ उजळेल

दीप अमावस्या २०२५: कणकेचा दिवा करण्याची सोपी पद्धत- कमी तेलात दिवा जास्त वेळ उजळेल

Highlightsकणिक सैल भिजली गेली तर दिव्याला व्यवस्थित आकार देताच येत नाही. तो लगेचच वेडावाकडा होऊन जातो. 

आषाढ महिना आता सरत आला आहे आणि लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आषाढ महिन्याचा शेवट होतो तो दीप अमावस्येने (Deep Amavasya 2025). दीप अमावस्येनिमित्त घरातले सगळेच पितळाचे, चांदीचे, तांब्याचे दिवे, समया घासून पुसून स्वच्छ केल्या जातात आणि त्या आकर्षक पद्धतीने मांडून त्यांची पुजा केली जाते. दिव्यांना वस्त्रमाळाही अर्पण केल्या जातात आणि त्या सगळ्या दिव्यांच्या सोबतीने एक कणकेचा दिवाही लावला जातो. कणकेचा दिवा पितरांच्या शांतीसाठी लावला जातो असं म्हणतात. त्यामुळे या दिव्याला या दिवशी खूप महत्त्व आहे (importance of atta diya on ashadhi Amavasya). पण अनेकजणींना कणकेचा दिवा व्यवस्थित तयार करता येत नाही. तो खूप वेडावाकडा होऊन जातो आणि त्याला तेलही खूप लागतं (kankecha diva recipe in Marathi). म्हणूनच आता या काही टिप्स पाहा आणि छान सुबक कणकेचा दिवा तयार करा.(How To Make Atta Diya For Deep Amavasya 2025)

 

दिप अमावस्येसाठी कणकेचा दिवा कसा तयार करायचा?

कणकेचा दिवा तयार करण्यासाठी अर्थातच आपल्याला कणिक लागणार आहे. तयार केलेला दिवा खूप मोठा किंवा खूप छोटा होऊ नये.. म्हणूनच साधारण मोठ्या आकाराची अर्धी वाटी कणिक एका दिव्यासाठी घ्या. 

सर्व्हायकल कॅन्सरची तपासणी करणं कोणत्या वयात जास्त गरजेचं? लक्षणं कोणती- आजार कसा ओळखायचा?

यानंतर त्या कणकेमध्ये १ टीस्पून हळद घाला. यामुळे दिव्याला छान पिवळसर रंग येतो. आता जेव्हा तुम्ही दिवा तयार करण्यासाठी कणिक भिजवाल तेव्हा ती नेहमी पोळ्या करताना भिजवतो तशी सैलसर भिजवू नका. नेहमीपेक्षा थोडी जास्त घट्ट भिजवा. कणिक सैल भिजली गेली तर दिव्याला व्यवस्थित आकार देताच येत नाही. तो लगेचच वेडावाकडा होऊन जातो. 

 

भिजवलेली कणिक ५ मिनिटे झाकून ठेवा आणि त्यानंतर ती पुन्हा मळून घ्या. आता तुम्हाला दिव्याला जो आकार द्यायचा असेल तशी निमुळता तळ असणारी वाटी घ्या. त्या वाटीला आतून थोडंसं तेल लावा. त्यामध्ये मळलेली कणिक घाला.

दीप अमावस्येला घरासमोर दिव्यांची रांगोळी हवीच! बघा ७ सोपे डिझाईन्स, घरात वाटेल प्रसन्न, मंगल

आता त्या कणकेच्या गोळ्याच्या मधोमध बोटाने दाब देऊन छिद्र पाडा आणि तो आकार पसरवून खोलगट करा. यानंतर वाटी उलटी करून आतला कणकेचा दिवा काढून घ्या. दिव्याची बाहेरची बाजुही अगदी छान चकचकीत होईल. आता हा दिवा दिसायलाही छान दिसेल आणि घट्ट असल्याने तो तेलही कमी घेईल. 
 

Web Title: how to make atta diya for deep Amavasya 2025, importance of atta diya on ashadhi Amavasya, kankecha diva recipe in Marathi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.