काही जाणकार मंडळी सांगतात की एखाद्या घरातल्या महिलेचं काम किती स्वच्छ आहे, हे जर तपासायचं असेल तर त्या घरातलं वॉशरूम पाहावं. कारण ते ठिकाण जर स्वच्छ असेल तर याचा अर्थ ते संपूर्ण घरच स्वच्छ आहे. यात खरोखरच खूप तथ्य आहे. वॉशरुम नेहमी स्वच्छच असायला हवं. पण काही घरांमध्ये असा प्रॉब्लेम होतो की वॉशरुमची कितीही स्वच्छता केली तरी त्यातून घाणच वास येतो. कुबटपणा जाणवतो. हे जर टाळायचं असेल आणि बाथरुममधली दुर्गंधी कमी करायची असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा....(simple hacks to remove odour or bad smell from washroom)
बाथरुममधील दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाय
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर बाथरुममधली दुर्गंधी कमी करायची असेल तर ते नियमितपणे घासणं खूप जास्त गरजेचं आहे. शिवाय फक्त टॉयलेट सीट घासूनच उपयोग नाही. बाथरुममधल्या टाईल्सही एक दिवसाआड घासायला हव्या. शिवाय बाथरुमच्या भिंतींची स्वच्छताही महिन्यातून एकदा व्हायलाच हवी.
२. वाॅशरूममधल्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवा. तिथे जर हवा मोकळी राहिली तर दुर्गंधी कमी होण्यास आपोआपच मदत होते.
३. वाॅशरुममध्ये एअर फ्रेशनर लावा आणि महिन्यातून एकदा ते बदला. जर शक्य असेल तर तिथे एक्झॉस्ट पंखा लावा. किंवा एअर प्युरीफायर मशिन बसवा. त्यामुळेही तिथली हवा स्वच्छ राहण्यास मदत होते. दुर्गंधी कमी होते.
४. बाथरुममध्ये जर एखादी खिडकी असेल किंवा तिथे जे कोणते कपाट असेल तिथे एका वाटीमध्ये थोडा बेकिंग सोडा आणि थोडं मीठ घालून ठेवा. हे मीठ आणि सोडा दर ८ दिवसांनी बदला. हे दोन्ही पदार्थ बाथरुममधली दुर्गंधी शोषून घेण्यास मदत करतात.
चेहऱ्याला लावा 'हे' रंगबिरंगी घरगुती स्क्रब- विकतच्या फेसमास्कची गरजच नाही, त्वचा नेहमीच चमकेल
५. जर शक्य असेल तर बाथरुमच्या खिडकीमध्ये एखादं स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट किंवा इतर कोणतही इनडोअर रोपं ठेवा. रोपांमुळेही हवा फ्रेश राहण्यास मदत होते.
