Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऊन वाढल्याने माठातलं पाणीही गार होत नाही? ४ सोपे उपाय- फ्रिजसारखं गारेगार होईल पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2026 12:46 IST

How to Keep Matka Water Cool?: ऊन वाढल्याने माठातलं पाणी गार होत नसेल तर पुढे सांगितलेले काही उपाय नक्कीच करून पाहा..(home hacks to get cool water from matka)

उन्हाळा सुरू झाला की हमखास माठातलं थंडगार पाणी पिण्याची इच्छा होते. ना भांड्यामधल्या पाण्याने तहान भागते,  ना फ्रिजमधलं अतिगार पाणी मनाला, शरीराला शांत करतं. माठातलं १ ग्लास गार पाणी मिळालं की मन आणि शरीर दोन्हीही कसं तृप्त झाल्यासारखं वाटतं. त्यामुळेच फेब्रुवारीच्या शेवटी साधारणपणे आपण नवा माठ घेताे. त्यात पाणीही छान गार होतं. पण नंतर जसा एप्रिलच्या मध्यावर उन्हाचा कडाका वाढतो, तसं तसं माठातलं पाणीही गार होणं बंद होतं. आता बहुतांश घरांमध्येही हाच अनुभव येत आहे. माठातलं पाणी गार होत नाहीये (How to Keep Matka Water Cool?). हे टाळायचं असेल तर काय उपाय करावे जेणेकरून माठातलं पाणी छान गार होईल ते पाहुया...(home hacks to get cool water from matka)

 

माठातलं पाणी थंडगार व्हावं यासाठी काय उपाय करावे?

१. माठाची जागा थोडी बदलून पाहा. माठ अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला हवा लागेल. एखाद्या खिडकीच्या समोर किंवा दरवाजाच्या बाजुला माठ ठेवून पाहा. माठाला हवा लागली की पाणीही गार होत जातं.

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

२. हळूहळू माठाची बारीक छिद्रं बंद होत जातात आणि त्यामुळेही पाणी गार होणं बंद होतं. त्यामुळे एक दिवसाआड माठ मीठ लावून आतून- बाहेरून घासा. त्यामुळेही त्याची छिद्रं मोकळी होत जातील आणि पाणी गार राहण्यास मदत होईल.

 

३. शक्यतो रात्री झोपण्यापुर्वी किंवा सकाळी अगदी लवकर मिठाने घासून घेतल्यानंतर माठ भरून ठेवा. यामुळे पाण्याला थंड होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि आपल्याला गारेगार पाणी मिळतं.

भाजीत तेल जास्तच झालं? ३ सोप्या ट्रिक्स, वरचा तवंग निघून तेल होईल कमी

४. माठाला कायम एक कपडा गुंडाळून ठेवा. टर्किशच्या टॉवेलसारखा जाडसर कपडा गुंडाळला तर जास्त उत्तम. हा कपडा कायम ओलसर राहू द्या. यामुळेही माठातलं पाणी थंड राहण्यास मदत हाेते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Matka water cool: Simple tips for fridge-like coolness this summer.

Web Summary : As summer intensifies, matka water loses coolness. Try these hacks: relocate the matka for airflow, clean pores with salt, refill at night, and wrap it in a wet cloth for fridge-like chilled water.
टॅग्स :समर स्पेशलपाणीकिचन टिप्सहोम रेमेडी