lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > चुकचुकणाऱ्या पालींवर करा १ जबरदस्त घरगुती उपाय; न मारता-घरातून काढतील सुसाट पळ

चुकचुकणाऱ्या पालींवर करा १ जबरदस्त घरगुती उपाय; न मारता-घरातून काढतील सुसाट पळ

How to get rid of lizards at home: Check here : घर कितीही साफ करा, तरीही घरात पाली शिरत असतील तर; एक घरगुती स्प्रे तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2024 02:53 PM2024-03-07T14:53:56+5:302024-03-07T14:55:05+5:30

How to get rid of lizards at home: Check here : घर कितीही साफ करा, तरीही घरात पाली शिरत असतील तर; एक घरगुती स्प्रे तयार करा

How to get rid of lizards at home: Check here | चुकचुकणाऱ्या पालींवर करा १ जबरदस्त घरगुती उपाय; न मारता-घरातून काढतील सुसाट पळ

चुकचुकणाऱ्या पालींवर करा १ जबरदस्त घरगुती उपाय; न मारता-घरातून काढतील सुसाट पळ

घर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी साफसफाई करत असतो. मात्र, तरी देखील झुरळं किंवा पालींचा वावर वाढत जातो. घरात पाल शिरताच बरेच जण घाबरून धूम ठोकतात. पण घरात पालींचा सुळसुळाट वाढणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही (Tips to get rid of lizards). नकळत पाली घरभर फिरतात. शिवाय किचनमध्ये जाऊन जेवणाच्या भांड्यांवरूनही फिरतात (Lizards). ज्यामुळे पोटाचे विकार, अन्नातून विषबाधा यासह इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.

पालींना पळवून लावण्यासाठी आपण केमिकल उत्पादनांचा वापर करतो. पण याचाही दुष्परिणाम आरोग्याला सहन करावा लागतो (Cleaning Tips). घरातून आपल्याला पालींना पळवून लावायचं असेल तर, काही गोष्टींची मदत घेऊन पालींना पळवून लावू शकता. ते कसे? पाहूयात(How to get rid of lizards at home: Check here).

घरातून पालींना पळवून लावण्यासाठी एक सोपा उपाय(Tips to get rid of Lizards)

उपाय पाहिला

लागणारं साहित्य

तुरटी

लाल मिरच्या

कळकट-चिकट सिलिंग फॅन होतील स्वच्छ, वापरा फक्त २ रुपयांची एक गोष्ट-फॅन चकाचक

कॉइल

मीठ

अशा पद्धतीने तयार करा पालींना पळवून लावणारे स्प्रे

पालींना पळवून लावणारे स्प्रे तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मॉसकिटो कॉइल तोडून घाला. नंतर त्यात लाल सुक्या मिरच्या, मीठ आणि तुरटी घालून मिक्स करा.

होगी रिहाना , होगी बेयॉन्से, साड्डी ता ऐ है, करीना.. दिलजित असे म्हणाला आणि..

१५ मिनिटांसाठी उकळत्या पाण्यात साहित्य शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर पाणी चहाच्या गाळणीने गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. ज्या ठिकाणी पाली फिरत असतील, त्या ठिकाणी स्प्रे करा, शिवाय पाल दिसताच तिच्यावरही स्प्रे करा. या स्प्रेच्या उग्र वासामुळे पाल घरातून धूम ठोकत पळ काढतील.

- याशिवाय आपण पालींना पळवून लावण्यासाठी कॉफी पावडर-तंबाखू पावडर मिक्स करून गोळे तयार करून ठेऊ शकता. या उपायामुळेही पाली घरातून पळ काढतील. नेफ्थलीनच्या गोळ्या वार्डरोब, वॉश बेसिन व इतर कोपर्‍यांमध्ये ठेवा. अश्या ठिकाणी पाल येणार नाही. 

Web Title: How to get rid of lizards at home: Check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.