Lokmat Sakhi >Social Viral > लिंबू पिळून साल फेकू नका, ‘असा’ करा वापर, बाथरुमच्या पिवळ्या टाइल्सही होतील चकाचक...

लिंबू पिळून साल फेकू नका, ‘असा’ करा वापर, बाथरुमच्या पिवळ्या टाइल्सही होतील चकाचक...

How do you clean bathroom tiles with lemon peels : महागडे बाथरुम क्लिनर तर आपण आणतोच, त्याऐवजी लिंबाची साल वापरुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 11:16 AM2023-10-10T11:16:13+5:302023-10-10T11:42:48+5:30

How do you clean bathroom tiles with lemon peels : महागडे बाथरुम क्लिनर तर आपण आणतोच, त्याऐवजी लिंबाची साल वापरुन पाहा...

How to Clean the Bathroom Tiles with Lemon Peel, TIPS ON HOW TO CLEAN BATHROOM TILES. | लिंबू पिळून साल फेकू नका, ‘असा’ करा वापर, बाथरुमच्या पिवळ्या टाइल्सही होतील चकाचक...

लिंबू पिळून साल फेकू नका, ‘असा’ करा वापर, बाथरुमच्या पिवळ्या टाइल्सही होतील चकाचक...

घराच्या सफाई कामात टाॅयलेट - बाथरुमची स्वच्छता करणं हे फार कंटाळवाणं काम असतं. एकतर रोजच्या घाईत अनेकजणंना रोजच्या रोज टाॅयलेट बाथरुम स्वच्छ करण्यास वेळ मिळत नाही आणि एखाद दिवशी वेळ मिळाला तर टाॅयलेट बाथरुम चटकन साफ कसं होईल याची काही युक्ती सूचत नाही. टाॅयलेट बाथरुम साफ करण्यात खर्ची पडणारा वेळ आणि लागणारी मेहनत यामुळे हे कामच नकोसं होतं. पण टाॅयलेट बाथरुमच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं आरोग्यास घातक ठरु शकतं. काही सोप्या युक्त्या वापरुन टाॅयलेट बाथरुमची स्वच्छता अगदी झटपट करु शकतो(How to Clean the Bathroom Tiles with Lemon Peel).

टाॅयलेट - बाथरुम ही घरातली अशी ठिकाण आहेत की जिथे सर्वात जास्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे किमान दर दोन दिवसाआड तरी टाॅयलेट - बाथरुम स्वच्छ (What is a homemade remedy for cleaning bathroom tiles?) करायलाच हवं. जिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत नाही सतत पाण्याचा ओलावा असतो अशा ठिकाणी बुरशी (1 genius ways of cleaning with lemon peel) लगेच वाढते. ही बुरशी वाढल्याने घरातील अनेकांना यामुळे आजाराच्या समस्या उद्भवू शकतात. आपले टाॅयलेट - बाथरुम जर आपण वेळीच स्वच्छ केले नाही तर ते खराब होते. एवढेच नव्हे तर कधी - कधी टाॅयलेट - बाथरुम मधील टाईल्स, शॉवर, टब, नळ यांवर बुरशीचा थर साचलेला दिसतो. अशावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सयुक्त फिनाईल किंवा लिक्विड सोपं वापरतो परंतु काहीवेळा याचा वापर करून देखील हवी तशी स्वच्छता करता येत नाही. अशा परिस्थितीत, आपण एक सोपा घरगुती उपाय वापरुन हे अस्वच्छ टाॅयलेट - बाथरुम (How can I clean bathroom tiles?) काही मिनिटांत स्वच्छ करु शकतो(If bathroom tiles are very dirty, what can be used to clean them?).

साहित्य :- 

१. रस काढून घेतलेल्या लिंबाच्या साली - २ बाऊल 
२. वॉशिंग पावडर - ५ ते ६ टेबलस्पून 
३. सॅनिटायझर - २ ते ३ टेबलस्पून 

रोजच्या वापरातला चपातीचा तवा झाला खराब ? १ सोपी ट्रिक, तवा होईल पुन्हा नव्यासारखा चकाचक...

कृती :- 

सर्वात आधी लिंबू बरोबर मधोमध कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. आता या सगळ्या लिंबातील रस काढून तो वेगळा करुन घ्यावा. रस काढून घेतलेले हे लिंबू एका डिशमध्ये ठेवून द्यावेत. आता त्या लिंबूवर प्रत्येकी एक चमचा वॉशिंग पावडर घालावी. आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक होईपर्यंत वाटून घ्यावे. मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले हे मिश्रण एका गाळणीत ओतून ते व्यवस्थित गाळून घ्यावे. हे मिश्रण गाळून झाल्यावर त्यात २ ते ३ टेबलस्पून सॅनिटायझर घालावे. सॅनिटायझर घातल्यानंतर आपले होमेमेड फिनाईल वापरण्यासाठी तयार आहे. 

मिक्सरचे झाकण लूज झाल्याने वाटण बाहेर उडते ? १ झटपट ट्रिक, झाकण बसेल फिट...

मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..

हे फिनाईल नक्की वापरावे कसे ? 

हे मिश्रण थेट टाॅयलेट - बाथरुममधील बुरशीवर किंवा काळ्या पडलेल्या टाइल्सवर लावून आपण खराब झालेले टाॅयलेट - बाथरुम अगदी मिनिटभरात स्वच्छ करु शकतो. यासोबतच आपण हे फिनाईल लिक्विड पाण्यांत घालून या पाण्याने घरातील फरशी देखील पुसू शकता. यामुळे फरशी, किचन टाईल्स, टाॅयलेट - बाथरुम मधील टाईल्स व बुरशी लागलेल्या बाथरूममधील वस्तू अगदी सहज स्वच्छ होतील.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

Web Title: How to Clean the Bathroom Tiles with Lemon Peel, TIPS ON HOW TO CLEAN BATHROOM TILES.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.