lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरचे झाकण लूज झाल्याने वाटण बाहेर उडते ? १ झटपट ट्रिक, झाकण बसेल फिट...

मिक्सरचे झाकण लूज झाल्याने वाटण बाहेर उडते ? १ झटपट ट्रिक, झाकण बसेल फिट...

How to fix a leaking blender jar : मिक्सरचे झाकण सैल झाल्यामुळे वाटणाचे कारंजे उडत असतील तर करा हा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2023 04:20 PM2023-10-03T16:20:02+5:302023-10-03T16:43:18+5:30

How to fix a leaking blender jar : मिक्सरचे झाकण सैल झाल्यामुळे वाटणाचे कारंजे उडत असतील तर करा हा उपाय...

how to fix blender which is worn - leaking and save your mixer from burn out. | मिक्सरचे झाकण लूज झाल्याने वाटण बाहेर उडते ? १ झटपट ट्रिक, झाकण बसेल फिट...

मिक्सरचे झाकण लूज झाल्याने वाटण बाहेर उडते ? १ झटपट ट्रिक, झाकण बसेल फिट...

किचनमध्ये अनेक उपकरणांचा वापर आपल्याकडून रोज केला जातो. मिक्सर हे किचनमधील सर्वात उपयुक्त असे मशीन आहे. आपले किचनमधील काम अधिक लवकर व सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी वेगवेगळ्या उपकरणांचा वापर केला जातो. झटकन मिक्सर फिरवलं आणि आपल्याला पाहिजे तो पदार्थ पटकन आपल्याला हवा तेवढा बारीक केला की कसं काम फटाफट होतं. मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर, फ्रिज, या सर्व उपकरणांमुळे आपले काम झटक्यात पूर्ण होते. पण कधी हेच मशीन बिघडल्याने आपले काम अर्धवट राहते. मिक्सरचा वापर आपण रोजच्या रोज तर करतोच. मिक्सरमध्ये रोज काही ना काही पदार्थ बारीक वाटून घेतो. अशाप्रकारे मिक्सरचा वापर रोजच्या रोज केल्यास काहीवेळा ते सतत वापरून त्यात बिघाड होतो(The blender jar leaks. What should I do?)

मिक्सरच्या सततच्या वापराने त्यातील ब्लेडची धार कमी होणे, मिक्सर योग्य पद्धतीने न फिरणे, त्याचे झाकण लूज होणे यांसारख्या अनेक समस्या येतात. काहीवेळा मिक्सर वापरुन त्याचे झाकण लूज होते. आपण अनेकदा या झाकणाच्या भोवती असलेला रबरी पट्टा पाहिला असेल तर तो सैल (Blender Leaking? How To Fix it Yourself! Quick, Cheap & Easy!) पडलेला दिसतो. झाकणाभोवतीचा हा रबरी पट्टा सैल झाल्यामुळे झाकण भांड्यावर व्यवस्थित फिट बसत नाही. परिणामी मिक्सरचे झाकण नीट न लागल्यामुळे बरेचदा पदार्थ वाटताना ते फसफसून बाहेर पडतात. हे झाकण लूज बसल्याने काहीवेळा तर हे मिक्सरचे झाकण उडून (How do I fix my leaking blender?) त्यातील सगळे पदार्थ बाहेर पडून (How do you stop a mixer jar from leaking?) किचन खराब होते. अशावेळी आयत्या कामाच्या गडबडीत हे मिक्सरचे लूज झालेले झाकण घट्ट करण्यासाठी आपण एका सोप्या घरगुती ट्रिकचा वापर नक्की करु शकतो(how to fix blender which is worn - leaking and save your mixer from burn out).

मिक्सरचे लूज झालेले झाकण फिट बसण्यासाठी एक सोपा उपाय... 

मिक्सरच्या लूज झालेल्या झाकणामुळे मिक्सरच्या भांड्यावर हे झाकण व्यवस्थित फिट बसत नाही. हे झाकण फिट न बसल्यामुळे अनेकदा गृहिणींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आयत्यावेळी कामाच्या गडबडीत बाजारांत जाऊन हे झाकण किंवा त्यावरील रबर बदलून आणावा इतका पुरेसा वेळ देखील नसतो. अशावेळी आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करून मिक्सरच्या सैल झालेले झाकण क्षणांत फिट करु शकतो. 

लोखंडी भांडी वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर कशी स्वच्छ ठेवावी ? ८ टिप्स, भांडी वापरा बिनधास्त...

१. सगळ्यांत आधी मिक्सरच्या भांड्याचे झाकण स्वच्छ धुवून, पुसून व्यवस्थित कोरडे करुन घ्यावे. 

२. आता मिक्सरच्या झाकणाला बाहेरून गोलाकार आकाराचे थ्रेडींग केलेले असते. या गोलाकार थ्रेडींग केलेल्या बऱ्याच खाचांपैकी एका खाचेत एक मोठा रबर बँड घेऊन तो अड्कवून घ्यावा. 

मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..

नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

३. हा रबर बँड त्या झाकणाच्या भोवती गोलाकार आकारात अडकवल्यामुळे मिक्सरचे झाकण भांड्यावर व्यवस्थित फिट बसते. 

४. असे हे रबर बँड बसविलेले झाकण आपण वापरु शकता. यामुळे हे झाकण मिक्सरच्या भांड्यावर फिट बसून, मिक्सरमध्ये पदार्थ वाटताना ते बाहेर पडत नाहीत. 

अशा प्रकारे एका रबर बँडचा वापर करुन आपण लूज झालेले मिक्सरच्या भांड्याचे झाकण चुटकीसरशी घट्ट करु शकतो.

Web Title: how to fix blender which is worn - leaking and save your mixer from burn out.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.