Join us

कास्ट आयर्नचे भांडे खराब न होता वर्षांनुवर्षे राहतील नव्यासारखे, 'या' पद्धतीने धुवा- भांडी गंजणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 11:40 IST

How to Clean Cast Iron Utensils?: हल्ली स्वयंपाकासाठी कास्ट आयर्न किंवा लोखंडी भांडी वापरण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. पण ती वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचंच आहे.(cleaning tips for the cast iron utensils)

ठळक मुद्देकास्ट आयर्नची भांडी वापरायचीच असतील तर ती या पद्धतीने नेहमीच स्वच्छ व्हायला हवीत. 

प्रत्येकवेळी काही ना काही नवा ट्रेण्ड येत असतो आणि तो आपल्या स्वयंपाक घरातही दिसायला लागतो. आता हेच पाहा ना सध्या स्वयंपाकासाठी लोखंडी भांडी वापरावीत असं खूप सांगितलं जातं. लोखंडी तवा, लोखंडी कढई यामध्ये केलेला स्वयंपाक असेल तर त्यातून जास्त प्रमाणात लोह मिळतं असं म्हणतात. त्यामुळे आता स्टीलच्या कढई ऐवजी कित्येक घरांमध्ये लोखंडी कढई दिसू लागल्या आहेत. लोखंडी तवा, लोखंडी कढई जरुर वापरा, पण ते वापरताना मात्र काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे (How to Clean Cast Iron Utensils?). कारण हल्ली मिळणाऱ्या कास्ट आयर्नची भांडी जर योग्य त्या पद्धतीने स्वच्छ केली नाहीत तर ती देखील गंजून आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.(cleaning tips for the cast iron utensils)

 

कास्ट आयर्नची भांडी कशी स्वच्छ करावी?

नॅशनल इंस्ट्यिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या अभ्यासानुसार जर खराब झालेल्या किंवा योग्य पद्धतीने स्वच्छ न केलेल्या कास्ट आयर्न भांड्यांमधला स्वयंपाक तुम्ही नेहमीच खात असाल तर त्यामुळे पोट बिघडणे, मळमळणे, कॉन्स्टिपेशन होणे असे त्रास होऊ शकतात. जेवणाची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे कास्ट आयर्नची भांडी वापरताना त्यांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्या.

केस गळाल्यामुळे भांग पसरट दिसतो, कपाळावरचे केसही गळाले? १ उपाय- नवे केस भराभर उगवतील

कास्ट आयर्नच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न लगेच दुसऱ्या स्टील किंवा काचेच्या भांड्यात काढून घ्या. ते तासंतास तसेच लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नका.

 

तसेच खरकटी कास्ट आयर्नची भांडी तशीच पाण्यात किंवा ओलसर जागी ठेवलेली आहेत असे होऊ देऊ नका. त्यांच्यातले अन्नपदार्थ काढून घेतल्यानंतर ती लगेच घासून स्वच्छ करा. भांडी धुतल्यानंतर लगेच कपड्याने स्वच्छ पुसून कोरडी करून घ्या.

सकाळी उठताच 'हे' पाणी प्या- दिवसेंदिवस चेहऱ्यावरचं तेज वाढतच जाईल, आरोग्यालाही मिळतील भरपूर फायदे

तसेच त्यानंतर ती एखाद्या मिनिटासाठी गॅसवर गरम करा. जेणेकरून त्यांच्यातला ओलावा पुर्णपणे कमी होईल. यानंतर त्यांच्यामध्ये अगदी थोडेसे तेल शिंपडा आणि ते कपड्याने पुसून घ्या जेणेकरून तेल लोखंडी भांड्याला आतून सगळीकडे लागेल. कास्ट आयर्नची भांडी वापरायचीच असतील तर ती या पद्धतीने नेहमीच स्वच्छ व्हायला हवीत. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्यहेल्थ टिप्स