Lokmat Sakhi >Social Viral > रोजच्या कढया काळ्या- कळकट झाल्या? ३ उपाय, ॲल्युमिनियमची कढई झटपट स्वच्छ- चकचकीत 

रोजच्या कढया काळ्या- कळकट झाल्या? ३ उपाय, ॲल्युमिनियमची कढई झटपट स्वच्छ- चकचकीत 

Black Stains On Aluminium Kadhai: काळपट पडलेल्या ॲल्युमिनियमच्या कढई (aluminium utensils) हा अनेक जणींसाठी वैताग असतो. म्हणूनच तर हे बघा काही उपाय, कढई चमकतील पुन्हा नव्या सारख्या.. (how to clean burnt kadhai?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 05:35 PM2022-06-13T17:35:55+5:302022-06-13T18:14:04+5:30

Black Stains On Aluminium Kadhai: काळपट पडलेल्या ॲल्युमिनियमच्या कढई (aluminium utensils) हा अनेक जणींसाठी वैताग असतो. म्हणूनच तर हे बघा काही उपाय, कढई चमकतील पुन्हा नव्या सारख्या.. (how to clean burnt kadhai?)

How to clean aluminium utensils or kadhai? 3 home remedies, simple cleaning tips | रोजच्या कढया काळ्या- कळकट झाल्या? ३ उपाय, ॲल्युमिनियमची कढई झटपट स्वच्छ- चकचकीत 

रोजच्या कढया काळ्या- कळकट झाल्या? ३ उपाय, ॲल्युमिनियमची कढई झटपट स्वच्छ- चकचकीत 

Highlightsहे काही उपाय करून बघा. थोडी जास्त मेहनत घ्या. पण त्यामुळे कढई मात्र एकदम स्वच्छ होईल आणि चमकू लागेल.

रोजच्या रोज स्वयंपाकात कढई (aluminium kadhai or utensils) लागतेच. एखाद्या दिवशी भाजी करपली किंवा मग गॅस जास्तच मोठा असला तर कढई लगेच जळतात. तिच्यावर काळे डाग दिसू लागतात. त्यात जर एखाद्या दिवशी काही पदार्थ तळले गेले असतील तर ज्या कढईत तळणं झालं आहे, ती कढई तर जास्तच काळवंडलेली (black stains on aluminium kadhai) दिसू लागते. काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो, पण त्या दगडानेही कढई म्हणावी तशी स्वच्छ होत नाही. शिवाय एखाद्या दिवशी घरात पाहूणे आलेच तर त्यांच्यासमोर अशी काळी, कळकट कढई काढायला लाजही वाटते. म्हणूनच तर हे काही उपाय करून बघा. थोडी जास्त मेहनत घ्या. पण त्यामुळे कढई मात्र एकदम स्वच्छ होईल आणि चमकू लागेल. (how to clean aluminium kadhai?)

 

ॲल्युमिनियमच्या कढईवर असणारे डाग काढण्यासाठी
१. कढईवरचे डाग काढण्यासाठी हार्पिकचा वापर करता येताे. पण त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या हातात ग्लोव्ह्ज घाला. कारण हातांसाठी हार्पिक हानिकारक ठरू शकते. ही पद्धत वापरण्यासाठी कढई आतून- बाहेरून थोडीशी ओलसर करा. कढईवर हार्पिक टाका आणि तारेच्या घासणीने कढईच्या सर्व भागांवर ते पसरवून घ्या. हलक्या हाताने एखादा मिनिट कढई घासून घ्या. त्यानंतर ती कढई १० ते १५ मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर कढईवर थोडे पाणी शिंपडा आणि तारेच्या घासणीने कढईवरचे काळे डाग काढा. डाग पटापट निघत असल्याचे जाणवेल.

 

२. कढई घासण्यासाठी हार्पिक वापरणे आवडत नसेल तर ही दुसरी पद्धत अवलंबून पहा. कढई आतल्याबाजूने काळपट झाली असेल तर काळपट झालेली कढई गॅसवर ठेवा. त्यात १ ग्लास पाणी टाका. त्यात ३ टेबलस्पून मीठ आणि तेवढाच बेकींग सोडा टाका. त्यात एक लिंबू पिळून टाका. आता कढईतले हे पाणी १० ते १५ मिनिटे चांगले उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. पणी कोमट झाले की त्यातले पाणी काढू एका बाऊलमध्ये टाका. लिंबाचं सालं कढईवर घासा. त्यानंतर कढईत पुन्हा एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकींग सोडा टाका आणि तारेच्या घासणीने घासा. कढईच्या बाहेरच्या बाजुने काळेपणा असेल तर तो काढण्यासाठीही हाच उपाय करावा. फक्त त्यासाठी दुसऱ्या एका मोठ्या कढईत वरीलप्रमाणे पाणी आणि इतर पदार्थ टाकावेत आणि त्यात बाहेरून काळवंडलेली कढई टाकावी. 

 

३. तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला मीठ, सोडा, वॉशिंग पावडर आणि लिंबू किंवा व्हिनेगर हे साहित्य लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी कढई गॅसवर तापायला ठेवा. ५ ते ७ मिनिटे कढई तापली की त्यात १ ग्लास पाणी टाका. २ चमचे मीठ, २ चमचे बेकींग सोडा आणि २ चमचे कोणतीही वॉशिंग पावडर टाका. व्हिनेगर असेल तर २ चमचे व्हिनेगर टाका किंवा मग एक चमचा लिंबू पिळा. व्हिनेगर आणि वॉशिंग पावडर टाकल्यामुळे पाण्यात फेस होईल. हा फेस कढईतून बाहेर येऊ लागेल. त्यामुळे कढईतलं मिश्रण वारंवार हलवत रहा. १० ते १५ मिनिटांनंतर गॅस बंद करा. कढईतलं पाणी कोमट झालं की ते दुसऱ्या एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता कढईत थोडंसं व्हिम लिक्विड टाका, थोडं बाऊलमधलं पाणी टाका आणि तारेच्या घासणीने एक- दोन मिनिटांसाठी कढई घासा 

 

Web Title: How to clean aluminium utensils or kadhai? 3 home remedies, simple cleaning tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.