Join us

शेजार्‍याच्या बैलाला ढोल!! पाहा होळीची भन्नाट मस्ती, गावोगावीची रीत न्यारी.. शिमागा ' असा ' होतो साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 16:28 IST

Holi 2025 : Holi Is A Fun Festival, The Customs Are Unique : आजही गावातून होळी साजरी करताना केली जाते भन्नाट मज्जा. पाहा काय काय पद्धती आहेत.

सणांचे स्वरूप कालपरत्वे बदलत जाते. भारतामध्ये कोसावर सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. (Holi Is A Fun Festival,  The Customs Are Unique.. )एकाच गावातील वेगवेगळ्या वाड्यांमध्ये सण साजरे करण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या पद्धतीमध्ये काही तरी नाविन्य असते. प्रथांमागे छान गोष्ट असते. प्रत्येक मान्यते मागे काही तरी कारण असते. (Holi Is A Fun Festival,  The Customs Are Unique.. )पण अशाची काही प्रथा आहेत, ज्या मज्जेसाठी साजर्‍या केल्या जातात. गावातील लोकांमधील एकोपा टिकून राहावा यासाठी त्या साजर्‍या केल्या जातात.    

कोकणामध्ये शिमगा हा फार धूमधडाक्यात साजरा केला जातो. शहरात कामानिमित्त राहणारे लोक सुट्टी न मिळाल्यास नोकरी सोडतात, पण शिमग्याला जातातच. एवढी त्या सणासाठी आत्मीयता लोकांमध्ये आहे. (Holi Is A Fun Festival,  The Customs Are Unique.. )तसेच संपूर्ण भारतातून लोक ब्रजला होळीसाठी जातात. तिथे ही फार धूमधडाक्यात होळी खेळली जाते. 

काही प्रथा आहेत ज्या आता शहरांमध्ये फार साजर्‍या केल्या जात नाहीत. मात्र काही गावांमधून आजही त्या साजर्‍या होतात. वडीलधार्‍यांना जर का या प्रथांबद्दल विचारलेत तर, ते तुम्हाला कमालीचे किस्से सांगतील. कारण जुन्या पिढ्यांनी तेवढ्या प्रमाणात हे सण साजरे केलेले आहेत. 

१. होलिका दहनावेळी आळीमधील लोकांच्या नावाने बोंबा मारण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे. एखाद्याचे नाव घेऊन त्याच्या बैलाला ढोल असं म्हणत बोंबा मारल्या जातात. 

२. होलिका दहन सुरू असताना होळीमध्ये नारळ कडधान्ये टाकली जातात. गाराणी घातली जातात. गावच्या भल्यासाठी देवाकडे साकडे मागीतले जाते. रात्रभर लपंडाव, आट्यापाट्या असे विविध खेळ खेळले जातात. गाणी म्हटली जातात.

३. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चोरी करण्याची प्रथा आहे. ही चोरी पैशांची नाही तर अन्नपदार्थांची असते. एखाद्याच्या बागेतील नारळ चोरायचे. फळे चोरायची. कैऱ्या चोरायच्या. मात्र पकडले न जाता. जर चोरी करताना कोणी पकडला गेला, मग त्याची दहनाच्यावेळी चांगलीच खरडपट्टी गावासमोर काढली जाते. 

४. धुळवडीला व रंगपंचमीला तर मज्जा असतेच, पण ही मज्जा दहा दिवस आधी पोपटीलाच सुरू झाली असते. पोपटीच्या रात्री मस्त चहा नाश्त्याची मैफील जमते. शंकासूर गावभर फिरायला लागतो.  

५. उत्तर प्रदेशात लाठमार होळी साजरी होते. महिला पुरूषांना लाठ्यांनी बडबून काढतात. डोक्याला मार लागू नये म्हणून डोक्यावर थाळा धरला जातो. मोठ्या समूहामध्ये  लाठमार होळी साजरी केली जाते. इतरही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते.

टॅग्स :होळी 2025होलिका दहनकोकणमहाराष्ट्रभारत