Lokmat Sakhi >Social Viral > मशिनमध्ये पीठ टाकलं की कुरकुरीत गरमागरम डोसा छापून थेट डिशमध्ये हजर, पहा प्रिंटेड डोसा 

मशिनमध्ये पीठ टाकलं की कुरकुरीत गरमागरम डोसा छापून थेट डिशमध्ये हजर, पहा प्रिंटेड डोसा 

Dosa Printer And Printed Dosa: पीठ जरा जास्तच पातळ झालं, डोसा तव्यावरच चिटकला, असं आता टेन्शनच नाही. प्रिंटरमधून कागद जसा बाहेर येतो, तसा आता डोसा बाहेर येईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 01:52 PM2022-08-26T13:52:53+5:302022-08-26T14:00:34+5:30

Dosa Printer And Printed Dosa: पीठ जरा जास्तच पातळ झालं, डोसा तव्यावरच चिटकला, असं आता टेन्शनच नाही. प्रिंटरमधून कागद जसा बाहेर येतो, तसा आता डोसा बाहेर येईल..

Have you ever seen dosa printer and printed dosa? Viral video of making printed dosa | मशिनमध्ये पीठ टाकलं की कुरकुरीत गरमागरम डोसा छापून थेट डिशमध्ये हजर, पहा प्रिंटेड डोसा 

मशिनमध्ये पीठ टाकलं की कुरकुरीत गरमागरम डोसा छापून थेट डिशमध्ये हजर, पहा प्रिंटेड डोसा 

Highlightsअगदी प्रिंट होऊन कागद जसा बाहेर येतो, त्यापद्धतीने डोसा बाहेर येतो. म्हणूनच त्याला डोसा प्रिंटर असं नाव देण्यात आलं आहे.

डोसा हा अनेक जणांचा आवडीचा पदार्थ. भाजी किंवा चटणीसोबतही अगदी छानच लागतो. पण डोसा (dosa recipe) करणं हे तसं थोडं ट्रिकी काम आहे. सगळ्यांनाच मऊ, जाळीदार डोसे करता येतील असं मुळीच नाही. अनेक जणींचा डोसा करण्याचा प्रयोग बऱ्याचदा फसतोच. कधी पीठ तव्यावर पसरवताना ते पळीलाच चिटकून येतं, तर कधी डोसा तव्यावरच चिटकून जातो. मग ते काढत बसणं हे मोठं वैताग आणणारं काम. म्हणूनच तर ही बघा डोसा करण्याची एक भारी आयडिया. सध्या सोशल मिडियावर याची चांगलीच चर्चा सुरू आहे. (Viral video of making printed dosa)

 

हा व्हिडिओ @NaanSamantha या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. खरंतर ती डोसा बनविणाऱ्या एका मशिनची जाहिरात आहे. डोसा प्रिंटर नावाचं हे मशिन भारतातच तयार करण्यात आलं असून आपल्या घरातील इतर इलेक्ट्रिक उपकरणं जशी असतात, तशाच पद्धतीचं हे मशिन आहे. या मशिनमध्ये एका ठिकाणी डोश्याचं पीठ टाकण्यासाठी, एका ठिकाणी बटर आणि तेल टाकण्यासाठीही जागा आहे. त्या त्या कप्प्यात ते- ते सामान टाकलं की मशिन सुरू करून टाकायचं. दुसऱ्या बाजूने एक ताट ठेवून द्यायचं. आतमध्ये प्रक्रिया होऊन डोसा तयार झाला की आपोआप तो आपल्या ताटात येऊन पडतो.

 

ज्याप्रमाणे एखादं प्रिंटिंग मशिन असतं, त्यासारखंच हे एक मशिन आहे. अगदी प्रिंट होऊन कागद जसा बाहेर येतो, त्यापद्धतीने डोसा बाहेर येतो. म्हणूनच त्याला डोसा प्रिंटर असं नाव देण्यात आलं आहे. या मशिनचं वजन अंदाजे ६ ते साडेसहा किलो असून त्याची किंमत जवळपास १६ हजार रुपये आहे. 

 

Web Title: Have you ever seen dosa printer and printed dosa? Viral video of making printed dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.