lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

Food and recipe: भाज्यांचे पराठे नेहमीच खाता.... आता हा नविनच व्हिडिओ पहा आणि रेसिपी आवडली तर गुलाबजाम पराठा (gulab jamun paratha) चाखून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 12:44 PM2022-02-23T12:44:06+5:302022-02-23T14:30:00+5:30

Food and recipe: भाज्यांचे पराठे नेहमीच खाता.... आता हा नविनच व्हिडिओ पहा आणि रेसिपी आवडली तर गुलाबजाम पराठा (gulab jamun paratha) चाखून बघा..

Gulabjamun paratha, viral recipe on social media, How to make gulabjamun paratha?  | आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

Highlightsपहा ही रेसिपी आणि आवडली तर करून बघा गुलाबजाम पराठा..

खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे आणि त्याच्या रेसिपी सोशल मिडियावर (social viral) शेअर करायच्या हा सध्याचा ट्रेण्ड.. यामध्ये अनेक weird food combinations देखील बघायला मिळतात. वडापाव आईस्क्रिम, मॅगी डोसा हे त्यातलेच काही प्रकार. आता याच प्रकारातला आणखी एक पदार्थ सोशल मिडियावर धूम करतो आहे. हा पदार्थ म्हणजे गुलाबजाम पराठा.. बटाट्याचे, वेगवेगळ्या भाज्या किसून केलेले पराठे तुम्ही नेहमीच खाल्ले असणार, पण गुलाबजाम पराठा हा अजब प्रकार मात्र बरेच जण पहिल्यांदाच ऐकत असणार..

 

इन्स्टाग्रामच्याtaste_bird या पेजवर SONIA NEGI यांनी ही रेसिपी शेअर (instagram share) केली आहे. काही जणांना हा गोड- गोड पराठा आवडला आहे, तर काही जणं 'एवढ्या छान पदार्थासोबत हे असले प्रयोग का करता रे... ' असं म्हणत वैतागले आहेत. या पोस्टमध्ये जे हॅशटॅग्स दिले आहेत त्यावरून हा गुलाबजाम पराठ्याचा व्हिडिओ आग्रा शहरातला आहे, हे दिसतंय.. ''Actually i am shocked but this turned out to be really good😋'' अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. त्यावरून तरी असं वाटतंय की पराठा नक्कीच छान, चवदार लागत असणार.. पहा ही रेसिपी आणि आवडली तर करून बघा गुलाबजाम पराठा..

 

या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की त्या शेफने सगळ्यात आधी कणकेचा गोळा घेतला. लहान पुरीएवढा तो लाटला. त्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे गुलाबजाम ठेवले. हे गुलाबजाम थोडे कुस्करून घेतले. त्यानंतर त्याला पुर्णपणे कव्हर करून घेतलं. ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी लाटताना किंवा बटाट्याचे पराठे लाटताना करतो, अगदी तसं.. त्यानंतर त्याने थोडंसं पीठ लावलं आणि हा पराठा लावला. पराठा अलगद तव्यावर टाकून भाजून घेतला. भाजताना त्याला भरपूर तूप लावलं. त्यानंतर हा गरमागरम पराठा सर्व्ह केला आणि त्यावर गुलाबजामचा पाक टाकाला... बघा कशी वाटतेय रेसिपी.. आवडली तर नक्की करा.

 

Web Title: Gulabjamun paratha, viral recipe on social media, How to make gulabjamun paratha? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.