lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मग - बादली फुटली? पाणी गळून वाया जातं? चमचाभर बेकिंग सोड्याचा सोपा उपाय- फेकून देण्याची गरजच नाही..

मग - बादली फुटली? पाणी गळून वाया जातं? चमचाभर बेकिंग सोड्याचा सोपा उपाय- फेकून देण्याची गरजच नाही..

Fix broken plastic mugs, buckets and utensils with Eno : तुटलेल्या प्लास्टिकचे मग आणि बादल्यांवर बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 12:50 PM2024-05-10T12:50:44+5:302024-05-10T12:51:55+5:30

Fix broken plastic mugs, buckets and utensils with Eno : तुटलेल्या प्लास्टिकचे मग आणि बादल्यांवर बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा..

Fix broken plastic mugs, buckets and utensils with Eno | मग - बादली फुटली? पाणी गळून वाया जातं? चमचाभर बेकिंग सोड्याचा सोपा उपाय- फेकून देण्याची गरजच नाही..

मग - बादली फुटली? पाणी गळून वाया जातं? चमचाभर बेकिंग सोड्याचा सोपा उपाय- फेकून देण्याची गरजच नाही..

बाथरूममध्ये आपण जास्त प्रमाणात प्लास्टिक मग आणि बादल्यांचा वापर करतो (Plastic Items). पण अधिक काळ वापरल्याने किंवा उंचीवरून खाली पडल्याने अनेकदा वस्तू तुटते (Viral Video). तुटलेली प्लास्टिकची वस्तू आपण शक्यतो वापरत नाही. त्यात कितीही पाणी साठवण्याचा प्रयत्न केला तरी, त्यात पाणी जमा होत नाही. अशावेळी तुटलेलं मग किंवा बादल्या निरुपयोगी समजून आपण फेकून देतो.

जर आपण नवीनचं बादल्या आणि मग विकत आणले असेल, आणि वापरताना तुटले असेल तर, बेकिंग सोडा, मीठ किंवा इनोचा वापर करून पाहा. इनोच्या वापराने तुटलेली वस्तू जोडण्यास मदत होईल. आता तुम्ही म्हणाल इनोच्या मदतीने प्लास्टिकची तुटलेली वस्तू कशी काय जोडली जाऊ शकते? तर हो, आपण इनो आणि फेविक्विकच्या मदतीने तुटलेली प्लास्टिकची वस्तू दुरुस्त करू शकता(Fix broken plastic mugs, buckets and utensils with Eno).

तुटलेले मग आणि बादल्या कशा दुरुस्त करायच्या?

लागणारं साहित्य

इनो

फेविक्विक

अशा पद्धतीने दुरुस्त करा तुटलेली प्लास्टिकची वस्तू

- आपल्या घरातील मग आणि बादलीचा तळ किंवा कोपरा फुटला असेल तर, कितीही त्यात पाणी साठवून ठेवा, त्यातून पाणी गळणारच. अशावेळी आपल्याला मग आणि बादली फेकून द्यायची नसेल तर, इनो आणि फेविक्विकचा वापर करून पाहा.

- सर्वप्रथम, तुटलेलं मग किंवा बादली सुती कापडाने पुसून घ्या.

फ्रिजचा डोअर रबर चिकट - त्यावर झुरळांची फौज? चमचाभर बेकिंग सोड्याचा उपाय-रबर होईल स्वच्छ

- प्लास्टिक वस्तूच्या तुटलेल्या भागावर आधी इनो घालून पसरवा. जर घरात इनो उपलब्ध नसेल तर, आपण बेकिंग सोडा किंवा मिठाचा देखील वापर करू शकता.

- प्लास्टिक वस्तूच्या तुटलेल्या भागावर इनो पसरवल्यानंतर त्यावर फेविक्विक लावून पसरवा.

उर्फी जावेदसारखा चमचमता ग्लो हवा चेहऱ्यावर? तांदुळाच्या पाण्यात मिसळा 'ही' माती चमचाभर; बघा जादू

- फेविक्विक व्यवस्थित लावून, तुटलेल्या भागावर पसरवल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने, हलक्या हाताने दाब द्या. नंतर ड्रायरच्या मदतीने थोड्या वेळासाठी सुकवून घ्या.

- आता आपण त्यात पाणी घालून पाहू शकता, तुटलेल्या प्लास्टिकच्या वस्तूमधून पाणी निघणार नाही. जर घरात कोणतीही प्लास्टिकची वस्तू तुटली असेल तर, दुरुस्त करण्याचा हा अतिशय सोपा मार्ग आपण अवलंबून पाहू शकता.

Web Title: Fix broken plastic mugs, buckets and utensils with Eno

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.